पुण्यातील एका धक्कादायक घटनेत अल्पवयीन मुलीसोबत रिक्षाचालकाने (rickshaw)गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. मुलगी रिक्षामध्ये प्रवास करत असताना रिक्षाचालकाने तिच्यासोबत अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे घाबरलेली मुलगी धावत्या रिक्षातून उडी मारून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला.
मुलीने उडी घेतल्यानंतर तिला किरकोळ दुखापती झाल्या असून, तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर रिक्षाचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. स्थानिक पोलिसांनी त्वरित कारवाई करून गुन्हा नोंदवला आहे आणि रिक्षाचालकाच्या शोधासाठी तपास सुरू आहे.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांनी मुलीच्या धाडसाचे कौतुक केले आहे. पोलिसांनी मुलीला योग्य ती मदत देण्याचे आश्वासन दिले असून, आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असे सांगितले आहे.
हेही वाचा:
गणपती आणण्यासाठी जाताना दुर्दैवी घटना; व्हॅन-दुचाकी अपघातात 2 जण ठार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा नव्या प्रचाराचा प्रारंभ
एम एस धोनीचा झंजावात रोखणाऱ्या 26 वर्षीय गोलंदाजांची भारतीय टेस्ट टीममध्ये एंट्री