रेल्वे (train)ओलांडताना अनेक भीषण अपघात घडत असतात. आपल्या निष्काळजीपणामुळे अनेक लोक अशा अपघातात आपला जीव गमवून बसतात. यामुळे रेल्वेकडूनही वारंवार रुळ ओलांडू नका अशा सुचना दिल्या जातात. पण यातून कोण धडा घेताना दिसत नाही. आता माणसंच जाऊद्यात मात्र प्राण्यांना याबाबत कसे शिकवायचे. अनेकदा असे घडते की, चालू ट्रेनसमोर कोणी प्राणी अचानक समोर येतो आणि त्याच्यासोबत जीवघेणा अपघात घडून येतो.
अनेकदा लोको पायलेटला रेल्वे(train) ट्रॅकवर कोणी प्राणी दिसल्यास ते दुरूनच ट्रेन थांबवतात. मात्र धावत्या ट्रेनसमोर अचानक कोणी प्राणी आल्यास त्यांना ट्रेन रोखणे कठीण पडते आणि यात मुक्या जीवांना आपला जीव गमवावा लागतो. सध्या असाच एक संवेदनशील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात धावत्या तर ट्रेनच्या समोर अचानक एक गाय आल्याने पुढे काय घडते ते दाखवण्यात आले आहे. हा व्हिडिओ पाहून क्षणार्धासाठी तुमचाही श्वास रोखला जाईल.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येते की, लोको पायलट वेगाने ट्रेन चालवत आहे आणि तितक्यात अचानक एक गाय रेल्वे ट्रॅकवर येते आणि रेल्वे रूळ ओलांडू पाहते. रेल्वे रुळावर गाय आणि वेगाने धावणारी ट्रेन हे दृश्य पाहून तुमचाही श्वास काहीकाळासाठी रोखला जाईल. मात्र विशेष म्हणजे, गायीला रुळावर पाहताच लोको पायलट ताबडतोब ट्रेनचा वेग कमी केला आणि गायीने रेल्वे रुळ ओलांडेपर्यंतची वाट पाहतो.
जेव्हा गाय रुळ ओलांडत नाही तेव्हा तो ट्रेन हळू चालवत असतो. यानंतर पुढे त्याला आणखी एक गाय रेल्वे रुळावर जाताना दिसली. ही गाय पाहून तो ट्रेन पूर्णपणे थांबवतो. ही गाय देखील रुळ ओलांडून जात नाही तोपर्यंत लोको पायलट ट्रेन पुढे नेली नाही. अशाप्रकारे लोको पायलटने एकाचवेळी दोन गायींना जीवनदान दिले.
आतापर्यंत अनेकदा अशा ट्रेन अपघातात आपण मुक्या जीवांनी आपला जीव गमावलेला पाहिला आहे. अनेकदा ट्रेनचा वेग इतका असतो की लोको पायलटला अचानक ट्रेन थांबवणे जमत नाही आणि परिणामी होत्याच नव्हतं घडून बसत. मात्र व्हायरल होत असलेल्या ट्रेनच्या पायलटने योग्य वेळी प्रसंगावधात दाखवल्याने गायीचा जीव वाचला. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यांनतर आता त्याच्या या कृत्याची आता सर्वजण कौतुक करत आहेत.
या घटनेचा व्हायरल व्हिडिओ @NareshYadav100 नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये , तुम्ही लोकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि लोको पायलटसाठी दोन शब्द लिहावेत असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “:खरोखर, लोको पायलटच्या मानवतेला आणि संवेदनशीलतेला सलाम”, तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो एक धार्मिक व्यक्ती आहे, भगवान नारायण त्याला आशीर्वाद देवो”.
हेही वाचा:
भाजपला खिंडार?; तब्बल ‘इतके’ नेते शरद पवार गटात जाणार?
केंद्राने अधिसूचना काढून औषध कंपन्यांना दिला डोस
भारतातील आरक्षण केव्हा संपणार?, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच मोठ विधान