भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची(match) टेस्ट सीरिज खेळवली जाणार असून 19 सप्टेंबर रोजी होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. यात विकेटकिपर म्हणून ऋषभ पंतचं टेस्ट क्रिकेटमध्ये पुनरागमन झालं त्याच्या जोडीला विकेटकिपर फलंदाज म्हणून ध्रुव जुरेल याला देखील संधी मिळाली आहे.
तर यश दयाल याला पहिल्यांदाच भारताच्या टेस्ट टीममध्ये निवड झाली असून या सिरीज (match)दरम्यान त्याचे टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण सुद्धा होऊ शकते. टीम इंडिया चेन्नई येथे बांगलादेश विरुद्धच्या सीरिजसाठी तयारी करत असताना भारताचा स्टार विकेटकिपर फलंदाज संजू सॅमसन याने आता मोठा निर्णय घेतला आहे.
भारताचा 29 वर्षीय क्रिकेटर संजू सॅमसन हा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व करतो. त्याच्या नेतृत्वात टीमने आतापर्यंत विजेतेपद जिंकले नसले तरी संजूच्या नेतृत्वात राजस्थानची टीम प्रत्येक सीजनमध्ये चांगला परफॉर्मन्स देते. आता संजू सॅमसनने फुटबॉलमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला असून संजू आता देशांतर्गत खेळवल्या जाणाऱ्या फुटबॉल लीगच्या एका टीमचा सहमालक बनला आहे. केरल सुपर लीगचा भाग असलेली फुटबॉल टीम मलप्पुरम एफसीचा सह मालक बनला आहे.
कोचीच्या जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये फोर्का कोची वर 2-1 ने विजय मिळवला. मलप्पुरम एफसीच्या ऐतिहासिक विजयानंतर लगेचच संजू सॅमसन या टीमशी जोडला गेल्याचे जाहीर करण्यात आले. मलप्पुरम जिल्ह्यातील या टीमचे होम ग्राउंड पय्यानाड स्टेडियम हे असून याची बैठक क्षमता 30,000 इतकी आहे.
केरल सुपर लीगचा यंदा पहिला सीजन आहे. ज्यात एकूण 6 टीम्स भाग घेतील. केरल सुपर लीग ही भारताच्या मुख्य फुटबॉल बोर्डाचा भाग नाही. परंतु स्थानिक फुटबॉल प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी ते उपयुक्त ठरू शकते.
संजू सॅमसन सध्या दुलीप ट्रॉफी 2024 मध्ये इंडिया डीचा भाग आहे. ईशान किशन दुखापतग्रस्त झाल्याने संजू सॅमसन याला इंडिया डी मध्ये संधी मिळाली. मात्र संजू सॅमसन याला पहिल्या सामन्यात प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची आधी मिळाली नाही. त्याच्या जागी केएस भरत याला विकेटकीपर म्हणून प्लेईंग 11 मध्ये निवडण्यात आले
संजू सॅमसन सध्या भारतीय रेड बॉल क्रिकेटचा भाग नाही. मात्र व्हाईट बॉल टीममध्ये त्याचे पदार्पण झाले असून संजू हा भारताच्या टी २० वर्ल्ड कप २०२४ च्या चॅम्पियन टीमचा भाग होता. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या वनडे टीममध्ये संजूला संधी मिळाली नव्हती मात्र त्याला टी 20 सिरीजमध्ये सामील करण्यात आले होते.
हेही वाचा:
शिंदे गट, अजित पवारांचा सुपडा साफ होणार? रोहित पवारांचा गौप्यस्फोट
गाय रेल्वे ओलांडणार तितक्यात भरधाव वेगाने ट्रेन आली अन्… Video Viral
शिंदेंची लेक होणार, गांधी घराण्याची सून? राहुल गांधी-प्रणिती शिंदेंच्या लग्नाच्या चर्चा थांबता थांबेनात