आनंदाची बातमी..! 20 किमीपर्यंत टोलमाफी, ‘या’ गाड्यांना मिळणार सुविधा

आपल्यापैकी अनेकजण दैनंदिन राष्ट्रीय महामार्गावर प्रवास(news) करत असतात. आता अशाच प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (जीएनएसएस) बसवलेल्या खासगी वाहनांसाठी महामार्गांवर दररोज 20 किलोमीटरपर्यंतचा प्रवास मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. 20 किलोमीटरचा हा मोफत प्रवास केवळ महामार्गांवरच नाही तर एक्स्प्रेस वेवरही लागू असणार आहे. यासंदर्भात केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

मंगळवारी (ता.१०) रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग शुल्क (दर निर्धारण आणि संकलन) नियम 2008 मध्ये सुधारणा करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे(news). यामध्ये या मोफत प्रवासाबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. या नवीन नियमांनुसार महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर 20 किलोमीटरपर्यंतचा प्रवास मोफत करण्यात आला आहे. तथापि, 20 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवासासाठी, वाहनधारकांना एकूण अंतरासाठी शुल्क आकारले जाणार आहे.

दरम्यान, अलिकडेच रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून फास्टॅगसह अतिरिक्त सुविधा म्हणून प्रायोगिक तत्त्वावर निवडक राष्ट्रीय महामार्ग उपग्रह आधारित टोल संकलन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अशातच आता राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर 20 किलोमीटरपर्यंतचा प्रवास मोफत करण्यात आल्याने प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. कर्नाटकातील एनएच-275 च्या बेंगळुरू-म्हैसूर सेक्शन आणि हरियाणातील एनएच-709 च्या पानिपत-हिसार सेक्शनवर हा प्रायोगिक प्रयोग राबवला जाणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग आणि एक्स्प्रेस वेवर चालणाऱ्या वाहनांकडून टोल टॅक्स वसूल केला जातो. त्यासाठी महामार्ग आणि द्रुतगती मार्गावर अनेक ठिकाणी टोल आकारणी केली जाते. यामध्ये यापुर्वी रोख रक्कम आकारली जात होती. त्यानंतर फास्टॅगची सुविधा सुरु करण्यात आली. तर आता जीएनएसएस ही प्रणाली सुरु करण्यात आली आहे. ही उपग्रह आधारित नेव्हिगेशन प्रणाली आहे.

आता हायवे किंवा एक्स्प्रेस वेवर कोणतेही वाहन प्रवास करताना अंतरानुसार खात्यातून आपोआप पैसे कापले जातील. भारताची स्वतःची नेव्हिगेशन सिस्टीम गगन आणि NavIC यांच्या मदतीने वाहनांचा माग काढणे सोपे होणार आहे. यासोबतच यूजरचा डेटाही सुरक्षित असणार आहे.

हेही वाचा:

महायुतीला झटका देणारं सर्वेक्षण समोर!

बहिणीच्या हळदीसमारंभात साई पल्लवीची धूम! पाहा VIDEO

‘आधी ऑलिम्पिकच्या लायकीचे तर व्हा,’ नवऱ्याचं ‘ते’ विधान ऐकताच सायना नेहवाल संतापली

मी शहीद होण्यास तयार; मनोज जरांगेंच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ