शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी महायुतीत काही जागांवर मैत्रीपूर्ण लढतींची गरज व्यक्त केली आहे. (political)
खोतकर म्हणाले की, ज्या ठिकाणी सर्व पक्षांमध्ये सहमती होत नाही, तिथं मैत्रीपूर्ण लढती व्हाव्यात. महायुतीत समसमान जागा लढवल्या पाहिजेत आणि शिवसेना शिंदे गटाला अधिक जागा मिळाल्या पाहिजेत, असा त्यांचा आग्रह आहे.
महायुतीतील तिन्ही पक्ष (शिवसेना, भाजप, आणि राष्ट्रवादी) काही जागांवर आक्रमक आहेत, त्यामुळं जिथं एकमत होत नाही तिथं आपलेच कार्यकर्ते इतर पक्षांकडे वळू नयेत यासाठी मैत्रीपूर्ण स्पर्धा होणं आवश्यक आहे, असं खोतकर यांनी सांगितलं.
हेही वाचा:
“घरच्या घरी हॉटेलसारखे पनीर कटलेट बनवायचे तरी कसे? जाणून घ्या सविस्तर रेसिपी”
“‘धर्म म्हणजे स्वयंपाकघर नाही’; सरसंघचालक मोहन भागवत यांचे महत्त्वपूर्ण विधान”
ऑक्टोबरमध्ये एसटीच्या साध्या डिझेल बसची नवी गाडी दाखल; प्रवाशांसाठी नवीन सुविधा