आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (election)महायुतीत भाजप आणि अजित पवार गटामध्ये जागावाटपावरून तणाव वाढला आहे. ‘सिटिंग-गेटिंग’ फॉर्म्युल्यानुसार अजित पवार गटाच्या २० आमदारांना पुन्हा उमेदवारी दिल्यास भाजपच्या अनेक पारंपरिक मतदारसंघांवर अडचणी निर्माण होऊ शकतात.
या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीविरुद्ध भाजपची गेल्या अनेक वर्षांची थेट लढत आहे, ज्यामुळे आता भाजपला आपल्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना वाढण्याची शक्यता आहे.
अमळनेर, वाई, कोपरगाव, आणि अहमदपूरसारख्या ठिकाणी अजित पवार गटाचा प्रभाव वाढल्याने या जागांवर तणाव निर्माण झाला आहे. जर अजित पवार गटाच्या आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली तर, भाजपमध्ये बंडखोरी आणि नाराजी वाढू शकते, ज्यामुळे आगामी निवडणुकीत महायुतीला नुकसान होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:
बारामतीत शिंदे गटाच्या कृतीमुळे राष्ट्रवादीचा संताप; अमोल मिटकरींचा शिंदे गटाला इशारा
साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक: युवकांना मानवतेचा मंत्र आणि आंतरभारतीची संकल्पना
महायुतीत मैत्रीपूर्ण लढतींचं संकेत, अर्जुन खोतकरांचं वक्तव्य “