लोकसभा निवडणुकीपासून बारामती मतदारसंघ(political news) प्रचंड चर्चेत आहे. कारण बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला होता. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये एक विधान केलं होत. त्यावेळी ते म्हणाले होते कि, पिकतं तिथं उगवत नाही.
तसेच बारामतीला माझ्याशिवाय नेतृत्व मिळालं पाहिजे. तसेच बारामतीकरांना मी सोडून आमदार(political news) देखील मिळाला पाहिजे. 1991 ते 2024 च्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा, असं विधान अजित पवार यांनी केलं होत. मात्र आता अजितदादांच्या या वक्तव्यावर शरद पवार चे नेते व माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना माजी मंत्री डॉ. सतीश पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना रोखलं का? उलट बारामतीकरांनी लोकसभेला त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. तसेच आता अजित पवार स्वतः म्हणत आहेत की, मी बारामतीमध्ये निवडणूक लढणार नाही. तर बारामतीमध्ये शरद पवार साहेबांची कामगिरी जास्त आहे. त्यामुळे अजित पवार हे स्वतः बारामतीमध्ये निवडणूक लढवायला घाबरत आहेत.
याशिवाय फुटून आलेले आमदार 2 हजार व 3 हजार कोटींची काम सांगत आहेत. तर त्यामध्ये देखील त्यांनी कीती टक्केवारी घेतलेली आहे असा जाब लोक त्यांना विचारत आहेत. त्यामुळे लोक यांचा हिशोब करणारच आहेत असं डॉ. सतीश पाटील यांनी म्हटलं आहे.
राज्यात महायुती सरकारने अनेक योजना आणून सुद्धा लोक त्याला भुलत नाहीत. अगदी त्याच कारणामुळे जास्तीत जास्त निवडणूका लांबवल्या जात आहेत. याशिवाय पर्याय म्हणून राष्ट्रपती राजवट लागण्याची सुद्धा शंका आम्हा सर्वांना वाटत आहे. त्यामुळे सगळे घरी जाणार आहेत.
राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येणार आणि सरकार देखील महाविकास आघाडीचं होणार असा विश्वास सतीश पाटील यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा:
सर्वात मोठी बातमी! मलायका अरोराच्या वडिलांनी केली आत्महत्या
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! DA वाढीचा मुहूर्त ठरला
भीषण अपघातानं कोल्हापूर हादरलं; एकाच गावातील तीन तरुणांचा मृत्यू