कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : येत्या नोव्हेंबर महिन्यात विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक(political issues) होईल. महायुती सत्ता राखेल किंवा सत्तांतर होऊन महा विकास आघाडीचे सरकार येईल. काही संस्थांनी जाहीर केलेले ओपिनियन पोल हे परस्पर विरोधी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मतदारांचा नक्की कौल कोणाच्या बाजूने आहे हे ठामपणे कुणीच सांगू शकत नाही. तथापि महायुतीला बहुमत मिळाले तर बिहार पॅटर्न महाराष्ट्रात राबवून मला मुख्यमंत्री करावे अशी इच्छा अजितदादा पवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या हाय कमांड कडे केली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने(political issues) 160 जागांवर दावा केला आहे. सर्वाधिक जागा पदरात पाडून घेऊन किमान 125 जागा प्रत्यक्षात जिंकायच्या अशी रणनीती भारतीय जनता पक्षाची आहे. याचा अर्थ , महायुतीला बहुमत मिळाले की मुख्यमंत्री भाजपचा करायचा असा होतो. शिंदे आणि अजितदादा गटाला प्रत्येकी 64 जागा द्यायच्या असा भाजपचा मनसुबा लपून राहिलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना प्रत्येकी 80 पेक्षा जास्त जागा हव्या आहेत. तसे झाले तर भाजपला 32 जागा सोडाव्या लागतील आणि 128 जागांवर समाधान मानावे लागेल. तथापि त्यांना ही तडजोड मान्य होईल असे नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसला जागा वाटपात 60 जागा मिळाल्या तर त्यांचे तितके उमेदवार निवडून येणार नाहीत. भाजप, शिवसेनेपेक्षा कमी जागा मिळणार हे गृहीत धरून अजितदादांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवावा असे म्हटले आहे. वास्तविक बिहार पॅटर्न यापूर्वीच महाराष्ट्रात राबवला गेला आहे. भाजपचे सर्वाधिक आमदार असूनही अवघे चाळीस आमदार असलेल्या एकनाथ शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्री पदावर विराजमान केले आहे. त्यामुळे पुन्हा तोच पॅटर्न स्वीकारला जाण्याची शक्यता दिसत नाही.
अजितदादा पवार हे त्यांचे काका शरद पवार यांचे बोट धरून 1990 च्या दरम्यान राजकारणात आले. पहिल्याच प्रयत्नात ते खासदारही झाले. पण नवी दिल्लीत ते रमले नाहीत. म्हणून ते महाराष्ट्राच्या सत्ता करण्यात आले. इसवी सन 2004 मध्ये अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळालेल्या असतानाही शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपद राष्ट्रीय काँग्रेसला दिले. आणि त्या बदल्यात दोन जादा मंत्रीपदे घेतली. तेव्हापासून आजपर्यंत अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री पदावरच राहिले आहेत.
मी महाराष्ट्राच्या राजकारणात इसवी सन 1990 मध्ये आलो, देवेंद्र फडणवीस हे इसवी सन 1999 मध्ये आले आणि एकनाथ शिंदे हे इसवी सन 2004 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात आले. माझ्यानंतर राजकारणात आलेल्या या दोघांनीही मुख्यमंत्रीपद पटकावले मी मात्र आहे त्याच ठिकाणी राहिलो अशी खंत अजितदादा पवार यांनी एका जाहीर कार्यक्रमात त्या दोघांनाही साक्षी ठेवून व्यक्त केली आहे. आता म्हणूनच ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कमी जागा येतील हे गृहीत धरून बिहार पॅटर्न राबवावा अशी मागणी करताना दिसतात. त्यांनी हे जाहीरपणे कबूल केलेले नसले तरी हा प्रत्यक्षरीत्या त्यांना एकदा मुख्यमंत्री पदाच्या मांडवाखालून जायचे आहे म्हणूनच ते बिहार पॅटर्न ची भाषा महायुती अंतर्गत करत आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. भारतीय जनता पक्षाने शिंदे यांना मुख्यमंत्री केले. हे सरकार स्थिर होते, कारण निर्विवाद बहुमत या सरकारला होते. पण तरीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून अजित दादा पवार यांना महाराष्ट्राच्या सत्तेत आणले हे भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आवडलेले नाही. साप्ताहिक विवेक आणि द ऑर्गनायझर या संघाच्या मुखपत्रातून स्वतंत्र लेखाद्वारे अजितदादा बद्दलची नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी बिहार पॅटर्न राबवला जाईल अशी शक्यता दिसत नाही.
बिहारमध्ये भारतीय जनता पक्षा पेक्षाही कमी जागा नितेशकुमारयांच्या जेडीयु कडे आहेत. पण तरीही एकदा नव्हे दोन वेळा भारतीय जनता पक्षाने जे डी यु च्या नितेश कुमार यांना बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान केलेले आहे. अजितदादा पवार हे यालाच बिहार पॅटर्न म्हणतात. पण महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हा बिहार पॅटर्न यापूर्वीच राबवलेला आहे.
हेही वाचा:
अजितदादा बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवायला घाबरतायेत, कारण…;
सर्वात मोठी बातमी! मलायका अरोराच्या वडिलांनी केली आत्महत्या
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! DA वाढीचा मुहूर्त ठरला