तारदाळ/खोतवाडी: सात(road)महिन्यांपूर्वी खोतवाडी-तारदाळ-हातकणंगले रस्त्याचे काम मोठ्या धूमधडाक्यात लोकप्रतिनिधींच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले होते. या रस्त्यासाठी बजेट झिरो चार मधून तीन कोटी 50 लाख रुपये मंजूर झाले होते, तसेच रस्ता देखभाल आणि दुरुस्तीसाठी दोन वर्षांचा निधीही मंजूर झाला होता. मात्र, रस्ता कामाचे उद्घाटन झाल्यानंतर ते काम त्वरित बंद झाले आणि तब्बल सात महिने त्याची काहीच हालचाल दिसली नाही.
महिन्याभरापूर्वी गटारीच्या कामाला सुरुवात झाली, पण त्यानंतरही खड्डे बुजवतानाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि निष्काळजीपणाने करण्यात आले आहे. खड्डे बुजवण्यासाठी आवश्यक असलेल्या खडी मुरमाच्या वापराऐवजी लाल मातीचा वापर करण्यात आला आहे, तसेच कोणताही रोलर न वापरता (road)ओबडधोबड पद्धतीने खड्डे बुजवण्यात आले आहेत. त्यामुळे या मातीमुळे रस्त्यावर शिखर तयार होऊन वाहनचालकांना वाहने घसरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. या निकृष्ट कामामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत असून भविष्यात या मातीमुळे रस्ता खचून जाऊन पुन्हा नवीन खड्डे निर्माण होण्याची शक्यता आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामांमध्ये सहसा बराच काळ लांबणीवर टाकला जातो. आता निधी मंजूर झाल्यानंतरही संबंधित ठेकेदार आणि अधिकारी या कामात कुचराई करत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. ठेकेदाराने चांगल्या दर्जाचे काम करण्याऐवजी (road) अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे निकृष्ट काम केले जात असून, अधिकाऱ्यांनी या कामाकडे कानाडोळा केल्यामुळे ठेकेदाराला मोकळीक मिळाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, कामाच्या गुणवत्तेवर कोणत्याही प्रकारची देखरेख न केल्यामुळे, या ठेकेदारांनी निधीचा गैरवापर करून आपले खिसे भरत आहेत. त्यामुळे ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कोण वचक ठेवणार, असा सवाल तारदाळ-खोतवाडीच्या ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. तसेच, निकृष्ट कामामुळे ग्रामस्थांच्या जिवावर बेतणारी परिस्थिती निर्माण होण्याआधी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
या संपूर्ण प्रकरणावर प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्यामुळे नागरिकांची नाराजी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
हेही वाचा:
सेलिब्रिटींकडे फारसे लक्ष न द्या; करीना कपूर खानचं स्पष्ट मत
“प्रेम त्रिकोणात अडथळा ठरलेला पोलीस सब इन्स्पेक्टर; लेडी कॉन्स्टेबलने अशा प्रकारे सोडवला पेच!”
वडिलांच्या मृत्यूने आभाळ कोसळलं, मलायकाचा पहिला VIDEO समोर
अजितदादा बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवायला घाबरतायेत, कारण…;