राज्यातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा; काही ठिकाणी पावसाला विश्रांती

मुंबई: राज्यातील विविध भागांमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा(rain) इशारा देण्यात आला असून काही जिल्ह्यांमध्ये पावसाला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.

वामान विभागाने पुणे आणि सातारा जिल्ह्यांसह घाटमाथ्याच्या भागांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, आणि कोकणातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

जिल्हावार हवामानाचा अंदाज:

  1. पुणे, सातारा: घाटमाथ्यावर जोरदार सरी, यलो अलर्ट जारी.
  2. उत्तर महाराष्ट्र: नाशिक, धुळे, नंदुरबार येथे पावसाचा अंदाज.
  3. मराठवाडा: जालना, परभणी, हिंगोली येथे विजांच्या कडकटासह पाऊस.
  4. कोकण: दक्षिण कोकणातील काही भागांमध्ये पावसाचा इशारा.

मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र ओसरल्याने राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. पावसाने विश्रांती घेतल्यास उन्हाचा चटका जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हेही वाचा:

७० वर्षांवरील ज्येष्ठांना मिळणार मोफत आरोग्य विमा; केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

खोतवाडी-तारदाळ रस्त्याचे निकृष्ट काम: ग्रामस्थांची नाराजी, ठेकेदार व अधिकाऱ्यांवर वचक कोण ठेवणार?

सेलिब्रिटींकडे फारसे लक्ष न द्या; करीना कपूर खानचं स्पष्ट मत