कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : राहुल गांधी यांनी अमेरिकेतील जॉर्ज टाउन विश्वविद्यालयामध्ये बोलताना भारतातील आरक्षण(reservation) विषयक व्यवस्थेबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भारतीय जनता पक्षाला त्यामुळे काँग्रेसवर निशाणा साधण्यासाठी संवेदनशील विषय किंवा मुद्दा मिळाला आहे. बुधवारी याच विषयावर भाजपने गल्ली ते दिल्ली रान उठवल्यानंतर काँग्रेसची मोठी अडचण झाली होती, पण राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा खुलासा केल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर पलटवार करायला सुरुवात केली. एकूणच आरक्षण विषयावरून राहुल गांधी यांचा वैचारिक गोंधळ झाला असल्याचे चित्र समोर आले आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी, शरद पवार यांच्यासह इंडिया आघाडीच्या घटक पक्ष नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेले संविधान धोक्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाला पुन्हा सत्तेवर आल्यानंतर हे संविधान बदलावयाचे आहे असा जोरदार दावा करून भाजपला इंडिया आघाडीने घाम फोडला होता. पण आता राहुल गांधी हेच संविधान विरोधी कसे आहेत? काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकसभा निवडणुकीत षडयंत्र असून दोन वेळा पराभव कसा केला? राष्ट्रीय काँग्रेस ही बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात कशी होती? हे मोठ्या आवाजात सांगायला भारतीय जनता पक्षाला राहुल गांधी यांच्या वादग्रस्त वक्तव्याने एक संवेदनशील विषय हातात मिळाला आहे.
भारत जेव्हा समृद्ध होईल, सर्वांना समान संधी उपलब्ध होईल तेव्हा मागासवर्गीयांना देण्यात आलेल्या आरक्षणाचा (reservation) आम्ही फेर विचार करू असे वक्तव्य राहुल गांधी यांनी अमेरिकेत जार्ज टाउन विश्वविद्यालयात बोलताना केले आहे. याशिवाय त्यांनी भारतातील शेख समाज धोक्यात आहे. त्यांना त्यांच्या स्वतंत्र धर्माप्रमाणे धर्माचरण करू दिले जात नाही. असा गंभीर आरोप करून राहुल गांधी यांनी सर्वांना चकित करून सोडले आहे. एरवी कोणत्याही विषयावर प्रतिक्रिया देण्यासाठी तात्काळ उपलब्ध होणारे संजय राऊत, जितेंद्र आव्हाड वगैरे राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर बुधवारी मौन बाळूगून होते. राहुल गांधी यांनी खुलासा करेपर्यंत महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते भांबावून गेले होते. काँग्रेसचे नाना पटोले यांना खुलासा करताना तारेवरची कसरत करावी लागत होती. आरक्षण विरोधी तसेच संविधान विरोधी भारतीय जनता पक्ष कसा आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न पटोले करताना दिसत होते.
एक महिन्यापूर्वी राहुल गांधी यांनी आरक्षण(reservation) विषयावर केलेले वक्तव्य हे त्यांच्या अमेरिकेतील वक्तव्याशी अगदीच विसंगत असल्याने त्यांचा काहीतरी वैचारिक गोंधळ झाला असल्याचे दिसते. जॉर्ज टाऊन विश्व विद्यालयातील आपल्या भाषणाने भारतामध्ये भारतीय जनता पक्षाने टीकेची झोड उठवली असल्याचे समजल्यानंतर राहुल गांधी यांनी त्यावर तातडीने खुलासा केला आहे.
बाळा माझ्या भाषणातील वाक्यांची मोडतोड करून मी आरक्षण विरोधी असल्याचे चित्र मीडियातून पुढे आले आहे. मी आरक्षण विरोधी बोललोच नाही. असा खुलासा त्यांनी घाईगडबडीने केला आहे. एक महिन्यापूर्वी राहुल गांधी यांनी केंद्र शासनाने आरक्षण मर्यादा वाढवण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी केली होती. अर्थातच ही आपली मागणी मान्य होणार नाही हे त्यांना माहीत असूनही आरक्षण मर्यादा वाढवावे असे सांगून त्यांनी आरक्षणाची लढाई लढणाऱ्या समाजाला चुचकारले होते. एकीकडे आरक्षण मर्यादा वाढवण्याची मागणी करणाऱ्या राहुल गांधी यांनी अमेरिकेत बोलताना मात्र वेगळीच भूमिका घेतली. त्यांची ही भूमिका आरक्षण विरोधी असल्याचे कोणीही म्हणेल.
बसपाच्या नेत्या मायावती यांनी राहुल गांधी यांच्यावर ते घटनाविरोधी आणि आरक्षण विरोधी असल्याची टीका केली आहे. मात्र आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या समाजातील नेत्यांनी मात्र राहुल गांधी यांच्या भूमिके विषयी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
सध्या महाराष्ट्रात आरक्षण विषयावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा एक संघर्ष उभा राहिला आहे. धनगर समाज हा स्वतंत्र आरक्षणासाठी मागणी करत आहे. उत्तर भारत तसेच गुजरात मध्ये अशाच प्रकारचा आरक्षणाचा विषय अधून मधून उसळी घेत असतो. नेमकी उलटी परिस्थिती शेजारच्या बांगलादेशमध्ये निर्माण झाली होती. आणि आरक्षण विरोधी मागणीतून उठलेल्या वादळामध्ये शेख हसीना यांची सत्ता पालापाचोळ्यासारखे उडून गेली होती. हा अगदी ताजा इतिहास आहे.
आरक्षण या विषयावर अशी उलट सुलट स्थिती असताना राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन तेथील विद्यार्थ्यांना संबोधित करताना भारतातील आरक्षण व्यवस्थेवर केलेले भाष्य, त्यांना भारतात अडचणीत टाकणारे आहे. आता त्यांनी खुलासा केला असला तरी भारतीय जनता पक्षाच्या आवाजात काँग्रेसचा आवाज काहीसा क्षीण झालेला दिसतो. महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीत राहुल गांधी यांच्या आरक्षण विषयावरील मताचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रचारात मुख्य मुद्दा केला जाणार आहे.
हेही वाचा:
इचलकरंजीत अटल महोत्सव: जनतेला कमी दरात खेळणी आणि आनंदाचा उत्सव
27 HP आणि खालील यंत्रमागधारकांना वीज दरात सवलत योजना मंजूर: सर्व संघटनांचे प्रयत्न यशस्वी
“मी दोन तास वाट पाहिली, पण… ”; ममता बॅनर्जींकडून राजीनाम्याची तयारी