छत्रपती संभाजीनगर : राज्य सराकरनं महिलांना आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना(Yojana) सुरु केली आहे. जुलै महिन्यापासून या योजनेची अंमलबजावणी केली जातेय. राज्य सरकारनं आतापर्यंत एक कोटी 59 लाख महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 रुपये दिले आहेत. या योजनेचा काही जण गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रकरणं उघडकीस येत आहेत. कन्नड तालुक्यातील 12 भावांनी महिलांचे फोटो लावून स्वत: अर्ज भरल्याची बाब उघड झाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये चक्क 12 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत(Yojana) अर्ज भरल्याचं समोर आलं आहे. आधारकार्डवर स्वत:च्या फोटोऐवजी महिलांचे फोटो लावून पुरुषांनी या योजनेअंतर्गत अर्ज केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा सगळा प्रकार कन्नड तालुक्यामध्ये घडला आहे. या तालुक्यामधून लाडकी बहीण योजनेअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या अर्जांच्या पडताळणीचं काम सुरु असताना हा प्रकार उघडकीस आला. बालकल्याण विभागाकडून अर्ज पडताळणी केली जाते. बालकल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांना 30 ऑगस्टच्या पडताळणीदरम्यान हा प्रकार समजला.
बहीणींच्या पैशावर डोळा ठेवणाऱ्या या 12 भावांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने दिलेल्या पोर्टलवर स्वत:च्या आधारकार्डाचा फोटो अपलोड केला. तसंच त्यांनी हमीपत्रामध्येही स्वत:चं नाव लिहिलं. मात्र फोटो अपलोड करताना त्यांनी महिलांचा फोटो वापरला होता. सविस्तर तपशील तपासला जाणार नाही असा या लोकांचा अंदाज होता. मात्र त्यांचा हा प्रयत्न फसला आणि पडताळणीदरम्यान हा बनाव उघडकीस आला. या प्रकरणामध्ये आता चौकशीचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
दरम्यान, अजित पवार यांनी काल एका ठिकाणी भाषण करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्यास कारवाईचा इशारा दिला होता. नवी मुंबईतील प्रकरणाचा दाखला देत ते म्हणाले होते की आम्ही देतो पण फसवणूक केली तर मग आम्ही तुरुंगात ही टाकतो. मग चक्की पिसिंग करा, असा इशारा अजित पवारांनी दिला होता.
हेही वाचा:
आज ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार…
आनंदवार्ता! दमदार बॅटिंगनंतर सोनं झालं स्वस्त
कारला ओव्हरटेक करणे पडले महागात, क्षणार्धात बाइकचे तुकडे अन् तरुण… Video Viral