ज्योतिष शास्त्रानुसार, लवकरच कन्या राशीत(rashi) 3 महत्त्वाच्या ग्रहांची युती होणार आहे. यामुळे बुधादित्य योग आणि त्रिग्रही योग जुळून येणार आहे. हा योग काही राशीच्या लोकांसाठी फार शुभकारक ठरणार आहे.
ग्रहांचा राजा सूर्य 17 सप्टेंबर 2024 रोजी संक्रमण करणार आहे. सूर्याचं संक्रमण होऊन कन्या राशीत(rashi) प्रवेश करणार आहे. या ठिकाणी केतु ग्रह उपस्थित आहे. सूर्य आणि केतुच्या संयोगाने महत्त्वाचे बदल घडून येणार आहेत.
23 सप्टेंबरला ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह संक्रमण करुन कन्या राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे कन्या राशीत सूर्य, बुध आणि केतुचा संयोग जुळून येणार आहे. यामुळे कन्या राशीत त्रिग्रही योग जुळून येणार आहे. तर, सूर्य आणि बुधच्या युतीने बुधदित्य योग बनणार आहे. या दोन्ही शुभ योगामुळे सर्व 12 राशींवर परिणाम होणार आहे. पण, यामध्ये 3 राशी लकी असणार आहेत.
तूळ रास
तूळ राशीच्या लोकांना त्रिग्रही योगाचा सकारात्मक परिणाम होणार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ होईल. तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला यश मिळेल. तुमचा मान-सन्मान वाढेल. तुमचे सर्व आजार दूर होतील. नवीन कार्याची सुरुवात चांगली ठरु शकते.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांना या काळात अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला अनेक स्त्रोतातून पैसे मिळतील. तसेच, अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमचं आरोग्य चांगलं राहील. मित्रांच्या सहकार्याने तुमची अनेक कामे पूर्ण होतील. तसेच, पैशांचा योग्य पद्धतीने वापर करा.
मकर रास
मकर राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमच्या पद, पैशांत चांगली वाढ होईल. तुमचा बॅंक बॅलेन्स वाढेल. तुमचं महत्त्वाचं कार्य पूर्ण होईल. तसेच, अनेक नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपविण्यात येतील. पैशांची गुंतवणूक करताना योग्य ठिकाणी करा. तुम्हाला चांगला लाभ मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
दुचाकींचा भीषण अपघात; ३ ठार, ३ गंभीर जखमी
शरद पवार गटाचं महाविकास आघाडीतील स्थान; जितेंद्र आव्हाड म्हणाले…
सांगलीत पत्त्याच्या क्लबवर पोलिसांचा छापा; ७ जणांची अटक, सव्वा अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त
आनंद आश्रमात पैसे उधळले ! शाखाप्रमुखांची हकालपट्टी; मुख्यमंत्री शिंदेंची मोठी कारवाई