चंकी पांडेची लेक अनन्या पांडे(Entertainment news) सतत आपल्या चर्चेत असते. गेल्या काही दिवसांमध्ये अनन्या आणि बाॅलिवूड अभिनेता आदित्य राॅय कपूर यांच्या रिलेशनची जोरदार चर्चा होती. सोशल मीडियावर अनन्याची फॅन फॉलोइंग देखील जबरदस्त आहे. आपल्या चाहत्यांसाठी अनन्या कायम नवनवीन पोस्ट शेअर करत असताना दिसत असते. दरम्यान, सध्या चर्चा आहे ती अनन्याच्या ब्रेकअपची.
अभिनेता आदित्य राॅय कपूर(Entertainment news) आणि अनन्या दोघे एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं. अनेकवेळा दोघेजण एका कार्यक्रमात सोबत पोहोचायचे. सोशल मीडियावर अनन्या आणि आदित्य राॅय कपूर या दोघांच्या नात्याबदल चर्चा असायची. मात्र, काही दिवसांपूर्वी अनन्या पांडे आणि आदित्य राॅय कपूरच्या ब्रेकअपबदल बोललं जात आहे. त्यावर अनन्याने अखेर मौन सोडलं आहे.
एका मुलाखतीमध्ये बोलत असताना अनन्या म्हणाली की, प्रेमाच्या बाबतीत मला रहस्यमयी राहायला आवडेल. कारण मला प्रेम करायला आवडतं. पण मी कोणत्याची डेटिंग साइटवर नाही. मला खऱ्या आयुष्यात लोकांना भेटायला आवडतं.
पुढे ती म्हणाली की, मला माझ्या आयुष्यात एक प्रेमकहाणी हवी आहे. माझ्या पार्टनरने माझा आदर करावा, माझ्याशी प्रामाणिक राहावं अशी माझी इच्छा आहे. जर हे गुण नसले तर ब्रेकअप होणं स्वाभाविक आहे. यावेळी सोशल मीडिया आणि त्यावर होणाऱ्या ट्रोलिंगवरही अनन्या बोलली आहे.
माझ्या मते सोशल मीडिया हा डान्सच्या व्हिडीओंसाठी चांगला आहे. तुम्ही तुमची मर्यादा ठरवली पाहिजे. मी पण माणूस आहे. जेव्हा एखादी वाईट कमेंट करण्यात येते, तेव्हा मलासुद्धा वाईट वाटतं. मी ट्रोलर्सना हेच सांगू इच्छिते की तुम्ही इतके वाईट कमेंट्स करू नका. त्याचप्रमाणे मी इतर लोकांना सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्या मनाचं ऐका, लोकांचं ऐकू नका.
हेही वाचा:
सर्वसामान्यांना झटका! खाद्य तेलाच्या दरात झाली मोठी वाढ
“विरोधकांनी पंतप्रधान पदाची ऑफर होती, पण..”; नितीन गडकरींचा मोठा खुलासा
लवकरच जुळून येतोय अतिशय शुभ योग; अनेक मार्गातून येणार पैसा, प्रत्येक क्षेत्रात मिळेल यश