सांगली : राज्यामध्ये सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह आहे. दोन दिवसांनंतर गणेशाचा विसर्जन(immersion) सोहळा पार पडणार आहे. हा विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी प्रशासनाची तयारी सुरु झाली आहे. पुण्यामध्ये देखील विसर्जन मिरवणूकीची तयारी सुरु आहे. त्याचप्रमाणे आता सांगली प्रशासनाने देखील विसर्जनाची तयारी सुरु केली आहे. मागील काही वर्षांमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीतील डीजे आणि लेझर लाईटचा वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. यामुळे पुणे प्रशासनानंतर आता सांगली प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
विसर्जन(immersion) मिरवणूकीमध्ये लेझर लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो आहे. यामुळे लहान मुलांसह सर्वांना आरोग्यासंबंधित त्रास सहन करावा लागत आहे. या धोकादायक लेझर किरणांचा मारा डोळ्यांना घातक ठरत असल्यामुळे कोल्हापुरात आणि पुण्यामध्ये बंदी घातली आहे. सांगलीतही याबाबतचे बंदी आदेश काढण्याबाबत पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात गणेश आगमनाच्या दिवशी मिरवणुकीत लेझर किरणांचा मारा केल्यामुळे एका कार्यकर्त्याच्या डोळ्याला इजा झाल्याचा प्रकार घडला. या प्रकारामुळे अनेकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. सांगलीतदेखील अनेक मंडळांनी आगमनाच्या दिवशी मिरवणूक काढून डीजेचा दणदणाट आणि लेझरचा झगमगाट केला. पोलिस प्रशासनाच्या आवाहनाला धुडकावून अनेक मंडळांनी डीजेचा आवाज वाढवला. तसेच घातक लेझर किरणांचा मारा केला. तसेच काही मंडळांनी पाचव्या दिवशीच्या मिरवणुकीत पोलिसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले.
दरम्यान, कोल्हापूर येथे अपर जिल्हा दंडाधिकारी यांनी लेझर लाईटबाबत बंदी आदेश जारी केला. त्यापाठोपाठ जिल्हा पोलिस प्रशासनाकडून अधीक्षक संदीप घुगे यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून लेझरबाबत बंदी आदेश जारी करण्याची मागणी केली. सायंकाळी उशिरा हे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयात दिले होते.
रात्री उशिरापर्यंत याबाबत आदेश काढण्यात आला नव्हता. परंतु, लवकरच याबाबत आदेश जारी केला जाईल, असे समजते. त्यामुळे आता पोलिसांचे विसर्जन मिरवणुकीकडे बारीक लक्ष राहणार आहे. प्रशासनाचा आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
रात्रीच्या सुमारास उडणाऱ्या ड्रोनवरून अनेक भागात अफवा पसरवल्या जात आहेत. विनापरवाना सार्वजनिक ठिकाणी ड्रोन उडवल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई केली जाईल. याबाबत पोलिसांना सूचना दिल्याचे अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
हेही वाचा:
राज्यात पुन्हा राजकीय उलथापालथ होणार; अजित पवारांच्या मनात नक्की चाललंय काय?
ST महामंडळाचा मोठा निर्णय; प्रवासात अडचण आल्यास थेट आगारप्रमुखांना फोन, नंबर झळकणार
धूम स्टाईलने चोरी; बाईकवरून आले अन् महिलेच्या गळ्यातील चैन खेचून पळाले,Video