कोल्हापुरातून(Kolhapur) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. राधानगरी येथील एका खासगी क्लासमध्ये शिकत असलेल्या नऊ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संतापजनक म्हणजे चिमुकलीवर 73 वर्षीय व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत.
बदालापूर व कोलकाता येथील प्रकरण ताजे असतानाच कोल्हापुरात(Kolhapur) हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. बदलापूर येथेली दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतीलच कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाचा लाट उसळली होती. नराधमाला शिक्षा व्हावी यासाठी आंदोलनेही करण्यात आली होती. बदलापूरची घटना ताजी असतानाच कोल्हापुरातही असाच प्रकार घडला आहे.
राधानगरी येथील खासगी क्लासमध्ये शिकत असणाऱ्या नऊवर्षीय चिमुकलीवर 73 वर्षीय व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथल्या खासगी क्लासमध्ये 73 वर्षीय श्रीपती भोसले या इसमाने पिडीतेला क्लासमध्ये बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी राधानगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोक्सो कायदा अंतर्गत श्रीपती भोसले या 73 वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. राधानगरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
उल्हासनगर येथील एका नामांकित शाळेतील पी.टी शिक्षकांनी एका सात वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. पि.टी. शिक्षकानं सात वर्षीय मुलीला ‘मला मिठी मार, माझी पप्पी घे नाहीतर तुला मारेल…’ असं बोलत धमकावलं. इतक्यावर न थांबता त्यानं या मुलीचं गालावर चुंबन घेऊन तिचा विनयभंग केला. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पि.टी. शिक्षकाला अटक केली. विद्या दानाच्या ठिकाणीदेखील चिमुकल्या मुली सुरक्षित नाहीत, अशी भावना समाजातून व्यक्त केल्या जात आहेत.
हेही वाचा:
एका आठवड्यात १९ हत्यांची घटना; ‘या’ देशात थरकाप उडवणारे हिंसाचार
परपुरूषासोबत शारीरिक संबंध…; पुण्यात महिला पोलिसावर गंभीर आरोप, तपास सुरू
सत्तेत आल्यास जुनी पेन्शन योजना लागू करणार; उद्धव ठाकरे यांचे आश्वासन