सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडीओ पाहायला मिळतात. अलीकडे अनेक मनोरंजक व्हिडीओ देखील तुम्ही पाहिले असतील. लोक असे असे डान्स(dance) रील्स बनवतात की, हसूनहसून पोट दुखून येते. तुम्ही लग्नातील, पार्टीमधील डान्सचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील, हा व्हिडीओ देखील एका पार्टीतील असल्याचे दिसत आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रीया दिल्या आहेत.
एका व्यक्तीने ढोलवर बसून डान्स(dance) करण्याचा प्रयत्न केला आहे. डान्स करायला जाताच क्षणी असे काही झाले की त्याच्या आजूबाजूचे लोक देखील जोरजोरात हसू लागले आहेत. असा डान्स करणे त्याला चांगलेच महागात पडले आहे. तो ढोलवर बसल्यावर ढोलची दोरी तुटल्याने खूप जोरात खाली पडतो. ज्यामुळे त्याला लागते.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक पार्टी सुरू आहे. एक व्यक्ती गळ्यात ढोल घालून वाजवत उभी आहे. त्याच्या आसपास त्याचे काही मित्र देखील आहेत. त्याच्या समोर उभी असलेली व्यक्ती ड्रमवर बसण्याचे ट्राय करतो. ड्रमवर बसल्यावर तो नाचू लागतो काही वेळ तो ढोलावर बसतो. आणि ढोल घेतलेली व्यक्ती ढोल वाजवायला लागते आणि तो नाचू लागतो. नाचू लागताच ढोलाची दोरी तुटते आणि तो खाली पडतो. तो इतक्या जोरात खाली पडतो की त्याला लागते. त्याच्या आजूबाजूचे लोक देखील हसू लागतात.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर रोहन भंडारी नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे, ‘गुरुत्वाकर्षणाचा अनुभव मिळाला.’ हा व्हिडिओ ४ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले आहे की, ‘भाऊ, तो पडला, मला लाज वाटली.’ आणखी एका यूजरने लिहिले आहे की, आता तो पुन्हा कधीच परत असे करणार नाही, त्याला चांगलीच अद्दल घडली असेल. तिसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की, ‘भाऊ, तुमचा अपमान झाला आहे.’
हेही वाचा:
UPI व्यवहाराची मर्यादा वाढली; एका दिवसात ‘इतके’ पैसे ट्रान्सफर होणार
गुड न्यूज! पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
कोल्हापूर हादरले! 73 वर्षांच्या नराधमाकडून नऊ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, क्लासमध्ये बोलवलं अन्…