अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन(celebrity) ही कायमच तिच्या आरस्पानी सौंदर्यामुळं चर्चेचा विषय ठरलीय. संपूर्ण जगावर सौंदर्यानं भुरळ घालणाऱ्या याच ऐश्वर्यानं मागील काही वर्षांमध्ये एक उत्तम आई, म्हणूनची तिची ओळख प्रस्थापित केली आहे. अशी ही अभिनेत्री नुकतीच तिच्या लेकिसह दुबई इथं पार पडलेल्या SIIMA 2024 या पुरस्कार सोहळ्यासाठी पोहोचली होती.
प्रत्यक्ष कार्यक्रमात पोहोचण्याआधी ही सेलिब्रिटी(celebrity) मायलेकींची जोडी सर्वप्रथम रेड कार्पेटवर आली आणि इथं त्यांच्यावरच कॅमेरांच्या नजरा खिळल्या. डिझायनगर आऊटफिटमध्ये यावेळी ऐश्वर्या आणि आराध्या दोघीही कमाल सुरेख दिसत होत्या. यावेळी रेड कार्पेटव या मायलेकींची एक Cute Moment कैद करण्यात आली.
कॅमेरांसमोर उभं राहून फोटोसाठी पोझ देत असताना ऐश्वर्यानं सर्वप्रथम तिच्या मुलीला म्हणजेच आराध्याला Comfertable केलं आणि त्यानंतर या दोघी फोटोसाठी तयार झाल्या. काही काही मिनिटांमध्येच त्या दोघींनीही एकमेकिंना किस केलं आणि आईला लेकीची मिळालेली साथ आणि या कमाल जोडीचं सर्वांनीच कौतुक केलं.
SIIMA 2024 या पुरस्कार सोहळ्यामध्ये ऐश्वर्याला तिच्या ‘पोन्नियन सेल्वन 2’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक पसंती) हा पुरस्कार प्रदान करण्ययाकत आला. ज्या क्षणी ऐश्वर्या हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर पोहोचली त्या क्षणी इतर कोणतीही मुलगी उत्साही असेल तितका उत्साह आराध्याच्या चाहऱ्यावर पाहायला मिळाला.
आराध्यानं अतिशय कुतूहलानं आणि कौतुकानं ऐश्वर्याला पुरस्कार मिळतानाचा क्षण मोबाईल कॅमेरामध्ये कैद केला. दरम्यान या दोघींचेही हे सुरेख क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यावर प्रतिक्रियांचा पाऊसही पडला. काहींनी या जोडीचं कौतुक केलं तर काहींनी मात्र या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. अॅश आणि तिच्या लेकीचा असा व्हिडीओ समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीसुद्धा आराध्या आणि तिनं अनेकदा कॅमेरासमोर एकमेकिंना किस केलं आहे. नात्यातील आपुलकी आणि प्रेम व्यक्त करण्याची मायलेकींची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली?
हेही वाचा:
श्री गणेश विसर्जन मिरवणूक कालची आणि आजची……!
राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
भाजप नेत्यानं धमकी दिली ‘वर्दी उतरवा देंगे…’, जिगरबाज ASI नं स्वत:च वर्दी काढली अन्…