कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : शरद पवार यांनी ज्यांचे राजकीय(political) पुनर्वसन पाच वर्षांपूर्वी केले त्या छगन भुजबळ यांनी अंतरवाली सराटी या गावातील आंदोलनाशी पवार कनेक्शन असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. त्यावर अपेक्षेप्रमाणे शरद पवार गटाकडून तिखट प्रतिक्रिया आल्या आणि तशा त्या आल्या नसत्या तर गौप्य स्फोटाला एक प्रकारे दुजोरा मिळाल्यासारखे झाले असते.
मुळातच अंतरवाली सराटी गावापासून सुरू होऊन राज्यभर पसरलेल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाकडे छगन भुजबळ हे सुरुवातीपासून तिरकस नजरेने पहात आले आहेत. पण त्यांनी पवार कनेक्शनचा गौप्य स्फोट करण्यासाठी विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त शोधला, आहे साधला आहे.
अंतरवाली सराटी या गावात सकल मराठा समाजाला आरक्षण(political) देण्यात यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले होते. पोलिसांनी तेथे जमलेल्या मराठा समाज कार्यकर्त्यांवर बेछूट लाठी हल्ला केला. पोलिसांनी बळाचा वापर करतात उपोषणाला बसलेले मनोज जभांगे पाटील हे तिथून पळून गेले होते. मात्र आमदार रोहित पवार, माजी मंत्री राजेश टोपे यांनी जरांगे पाटील यांना पुन्हा उपोषण स्थळे आणून बसवले. असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे अशा प्रकारचे पवार कनेक्शन आहे किंवा होते असे भुजबळ यांना म्हणावयाचे आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे शरद पवार आहेत असा संशय यापूर्वी अनेक राजकीय मंडळींनी व्यक्त केलेला आहे. मात्र छगन भुजबळ यांनी रोहित पवार आणि टोपे यांची थेट नावे घेऊन या आंदोलनामागे शरद पवार यांचाच हात आहे, असा थेट आरोप केलेला आहे. अर्थात त्यांच्या या वक्तव्यानंतर संतप्त झालेल्या सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळ धादांत खोटे बोलतात अशी घनाघाती टीका केली आहे. रोहित पवार यांनीही त्यांच्या वक्तव्याचा परखड शब्दात समाचार घेतलेला आहे. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्याही त्याच प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत.
अंजली दमानिया यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात छगन भुजबळ यांना सुरुवातीला आर्थर रोड जेल नंतर भायखळा जेल येथे दोन वर्षांपेक्षा अधिक काळ राहावे लागले होते. तेव्हा शरद पवार यांनी मी आणि माझा पक्ष छगन भुजबळ यांच्या पाठीमागे आहे असे स्पष्ट शब्दात सांगितले होते. नंतर छगन भुजबळ हे जामिनावर सुटले आणि संबंधित खटल्यातूनही त्यांची निर्दोष मुक्तता झाली. 2019 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यामध्ये छगन भुजबळ यांना कॅबिनेट मंत्री म्हणून घेतले गेले. तेव्हा “माझा राजकीय पुनर्जन्म हा केवळ शरद पवार यांच्यामुळे झालेला आहे, माझे राजकीय पुनर्वसन त्यांनी केले आहे”अशा शब्दात छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली होती. आता हेच छगन भुजबळ शरद पवार यांच्यावर उलटलेले दिसतात.
शरद पवार(political) यांनी छगन भुजबळ यांच्या येवला विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेऊन मी तुम्हाला चुकीचा उमेदवार दिला त्याबद्दल मी तुमची माफी मागतो असे वक्तव्य केले होते तेव्हा भुजबळ यांनी राज्यात कुठे कुठे माफी मागणार असा सवाल शरद पवार यांना विचारला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ शरद पवार यांच्यामुळे नव्हे तर आमच्यामुळेच मोठा झाला आहे असेही त्यांनी सांगितले होते. एकूणच शरद पवार विरुद्ध छगन भुजबळ असे काही काळ चित्र होते. अंतरवाली सराटी आंदोलन स्थळावर पोलिसांनी बळाचा वापर, लाठी हल्ला केला, त्यात अनेक कार्यकर्ते जखमी झाले, तेव्हा सर्वात आधी जखमींची विचारपूस करण्यासाठी शरद पवार हे रुग्णालयात पोहोचले होते.
त्यानंतर एका छोट्याशा गावापुरते मर्यादित असलेले मनोज जरांगे पाटील हे सकल मराठा समाजाचे महाराष्ट्राचे नेते बनले. अवघा मराठा समाज त्यांच्या बाजूने उभा राहिला. आणि त्यानंतर मात्र छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या आंदोलनाच्या विरोधी भूमिका घ्यायला सुरुवात केली. सध्या तर मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ असा एक संघर्ष उभा राहिला आहे.
अंतरवाली सराटी येथे पोलीस बळाचा वापर झाल्यानंतर बराच काळ छगन भुजबळ हे त्यावर कोणत्याही प्रकारचे भाष्य करताना दिसत नव्हते. नंतर त्यांनी 70 पेक्षा अधिक पोलीसही जखमी झाले असे सांगायला सुरुवात केली. आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर हल्ला मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनीच केला असा आरोप त्यांनी केला आणि आता या संपूर्ण आंदोलनामागे पवार कनेक्शन आहे आणि होते असा गौप्य स्फोट त्यांनी केला आहे. पवार कनेक्शन सांगायला त्यांनी इतका कालावधी का घेतला? तेव्हाच त्यांना सांगणे शक्य होते, आत्ताच त्यांनी पवार कनेक्शन सांगायला सुरुवात केली आहे आणि त्याचे कारण तोंडावर आलेल्या इलेक्शन आहेत.
हेही वाचा:
श्री गणेश विसर्जन मिरवणूक कालची आणि आजची……!
…आणि ऐश्वर्या- आराध्यानं कॅमेरासमोरच एकमेकिंना किस केलं
शरद पवारांमुळे महाराष्ट्राला जातीयवादाचा कॅन्सर झालाय, ‘या’ नेत्याची जहरी टीका