सध्याच्या सोशल मीडियाच्या(social media) जगात कधी काय पाहायल मिळेल हे सांगता येत नाही. अनेकदा आश्चर्यचकित करणारे असे व्हिडीओ समोर येतात जे पाहून विश्वास बसत नाही. अनेकदा असे वाटते की खरेच असे घडू शकते का. लहान मुलांचे तर अनेक भन्नाट व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. कधी कधी ही लहान मुले देखील मोठ्यांना विचार करायला भाग पाडतात असे काही करतात, बोलतात. सध्या असाच एक 2 वर्षांच्या चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.
सोशल मीडियावर(social media) हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक लहान मूल पाण्याखाली पोहताना दिसत आहे. हा व्हिडीओ लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे, कारण व्हिडीओमध्ये लहान मूल कोणत्याही भीतीशिवाय सहज पोहताना दिसत आहे. हे मूल 2 वर्षाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. मुल बराच वेळ श्वास रोखून पाण्याखाली पोहताना आणि खेळतानाही दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, या मुलाचे वय सुमारे 2 वर्षे आहे. पाण्यात शिरताच मूल सहज पोहायला लागते.
लहान मुलाच्या पोहण्यावरून असे दिसते की त्याला पोहण्याचे उत्तम प्रशिक्षण दिले आहे, परंतु त्याचे वय इतके लहान आहे की सहसा या वयात मुलांना पाण्याची भीती वाटते किंवा त्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष खबरदारी घेतली जाते. ते पाण्यात स्टंट करताना देखील दिसत आहे. पाण्यामध्ये काही वस्तू आहेत जे पार करून तो पोहत आहे. अगदी एखाद्या स्पर्धेत ज्या पद्धतीने अडथळे असतात तसेच यामध्ये दिसत आहे. व्हिडीओ पाहून लक्षात येते की, मुलाला एक टास्क पूर्ण करायला सांगितले असून तो अगदी सहज ते पूर्ण करतो.
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @AbhayRaj_017 या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ मोठ्या प्रमामात व्हायरल होत आहे. तसेच व्हिडीओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. तसेच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत.
एका युजरने म्हटले आहे की, मला आश्चर्य वाटते, हा माझ्यापेक्षा देखील चांगले पोहत आहे, तर काही लोकांनी याला आश्चर्यकारक करिष्मा म्हटले आहे. बरेच लोक हे मुलाच्या आश्चर्यकारक क्षमतेचे कौतुक करत आहेत. या व्हिडिओमुळे प्रेरित झालेले अनेक पालक आपल्या मुलांनाही पोहणे शिकवण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.
हेही वाचा:
गणपती विसर्जनादिवशी वरूणराजा देखील हजेरी लावणार?
ब्रेस्ट कॅन्सरसोबत लढा देणाऱ्या हिना खानचा नववधूच्या वेशात रॅम्पवॉक
महायुतीतून आम्हाला मोकळं करा; युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांचं धनंजय महाडिकांना आवाहन