घड्याळ काढणार, तुतारी धरणार; अजितदादांना होमपिचवरच धक्का

प्रशांत श्रीमंदिलकर, पुणे : लोकसभेनंतर आता विधानसभा(politics) निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसात आचारसंहिता लागण्याचे संकेत मिळत आहेत. त्यातच स्थानिक राजकारणाला देखील ऊत आला आहे. माजी आमदार रमेश आप्पा थोरात लवकरच ‘घड्याळ’ सोडून ‘तुतारी’ हाती घेण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खुद्द रमेश थोरात यांनीच यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दौंडमध्ये मोठा धक्का बसणार आहे.

दौंड विधानसभा (politics)मतदारसंघ हा भाजपला सुटण्याचे जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे रमेश थोरात यांची राजकीय अडचण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे रमेश थोरात यांनी गावोगावी जाऊन दौरे करण्यास सुरुवात केली आहे. तसेच नागरिकांची मते घेऊन ते आपली भूमिका ठरवणार आहेत. त्यामुळे दौंडमध्ये अजित पवार यांना मोठा धक्का बसणार असल्याचे मानले जात आहे.

रमेश थोरात हे अजित पवारांचे कट्टर समर्थक मानले जातात. जुने आणि अनुभवी नेते असल्याने त्यांचे दौंड तालुक्यामध्ये मोठे वलय आहे. मात्र दौंडची जागा भाजपला सुटली, असे रमेश थोरात जरी म्हणत असले तरी याबाबत अजून ठोस निर्णय झालेला नाही.

मात्र रमेश थोरात यांनी आपण लवकरच तुतारी हाती घेणार असून त्याबाबत विचार विनिमय सुरू असल्याचे देखील त्यांनी सांगितले. जर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून संधी नाही मिळाली, तरी अपक्ष उभे राहण्याची तयारी देखील रमेश आप्पा थोरात यांनी दर्शवली आहे. विद्यमान भाजप आमदार राहुल कुल यांना देखील हे न परवडणारे असून महायुतीला देखील याचा धक्का बसू शकतो.

रमेश थोरात हे सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहिले. मात्र राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले. मात्र आता राजकीय समीकरणे बदलू लागली असून शरद पवारांसोबत सहानुभूतीची लाट पाहायला मिळत आहे. त्यातच लोकसभेला शरद पवार यांना मिळालेले यश ही जमेची बाजू आहे.

विधानसभेला मात्र दौंडची जागा भाजपला मिळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आपण येथे आठवड्याभरामध्ये आपली पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे रमेश थोरात यांनी सांगितले आहे. त्यामुळे दौंड तालुक्यामध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसणार आहे.

हेही वाचा:

सळसळणारा उत्साह आणि रस्त्यावर उतरलेला जनसागर

BSNL सुपर रिचार्ज! दररोज 3 रुपये पेक्षाही कमी खर्चात 10 महिन्यांचा रिचार्ज

PM मोदींचा आज वाढदिवस, 600 हून अधिक भेटवस्तूंचा होणार लिलाव