अभिनेता सलमान खानचे वडील(father) सलीम खान यांना धमकावल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. एका अज्ञात बुरखा घातलेल्या महिलेने सलीम खान यांना धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
सलीम खान यांना धमकावल्याप्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल सकाळी सलीम खान(father) हे मॉर्निंग वॉकसाठी बँडस्टँड परिसरात गेले असता त्यांना स्कूटरवरून आलेल्या एका व्यक्तीने आणि बुरखा घातलेल्या महिलेने धमकावले आहे. एक अनोळखी महिला त्यांच्याकडे आली आणि लॉरेंस बिश्नोई को भेजूं क्या? असे विचारत तिने त्यांना थेट धमकी दिली आहे.
याआधीही सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईकडून धमक्या आल्या होत्या. वांद्रे पश्चिम येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्येही गोळीबार झाला होता. वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल करून स्कूटर चालविणाऱ्याला अटक केली आणि फरार महिलेला पकडण्यासाठी दोन पथके तयार केली आहे.
याप्रकरणी आधी माहिती अशी की, जेव्हा सलीम खान यांना धमकी मिळाली तेव्हा ते बँडस्टँडच्या बाकावर बसले होते. मात्र याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यात असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. ज्यामध्ये त्यांना दोन लोक स्कूटरवरून जाताना दिसले. व्हिडिओ फुटेजच्या आधारे आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मुंबई पोलीस या प्रकरणाचा विविध अँगलने तपास करत आहेत. मात्र, याप्रकरणी मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. कारण एप्रिल महिन्यात अभिनेता सलमान खानच्या अपार्टमेंटबाहेर राऊंड गोळीबार करण्यात आला होता, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.
हेही वाचा:
कंगना पुन्हा नको ते बोलली; भाजप नेत्याने दिला थेट इशारा
शक्तीपीठ महामार्गावरून राजू शेट्टी आक्रमक; रक्ताचे पाट वाहतील पण…
मानवी हाडांचा सापळा, झाडाच्या फांदीवर कवटी, ‘मला मदत करा..,’ पडलेल्या स्वप्नामुळे मृतदेहाचा शोध