वर्धा: “आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. अमरावतीच्या मित्रा टेक्सटाईल पार्कचे(Textile Park) भूमिपूजन आज होत आहे. आर्य चाणक्य प्रशिक्षणाची सुरूवात होत आहे, अहिल्याबाई होळकर स्टार्टअपची सुरूवात होत आहे, आणि पीएम विश्वकर्माच्या योजनेच्या अंतर्गत राज्यातील दोन लाख लोकांना मदत मिळत आहे. आज एका कार्यक्रमात साडेसहा लाख कुटुंबाचे चित्र बदलणार आहे.” अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते वर्ध्यात आयोजित सभेत बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (20 सप्टेंबर) विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज वर्ध्यातील विविध योजनांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पीएम मोदी ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमात सहभागी होतील, जिथे ते योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि कर्ज देतील. विश्वकर्मा योजनेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान एक स्मरणार्थ टपाल तिकीटही जारी करतील. याशिवाय पंतप्रधान मोदी आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्ट-अप योजना सुरू करणार आहेत.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ज्यांना ज्यांना आपल्या जिवनात परिवर्तन घडवायचे आहे त्यांच्यासाठी पंतप्रधान मोदीनी संधी तयार केली. पंतप्रधानांनी बारा बलुतेदारांना, मायक्रो ओबीसींना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रशिक्षण दिले. त्यांना रोजगारासाठी वित्त साहाय्य केलं.
टेक्सटाईल पार्क(Textile Park) ही अशी संकल्पना आहे आमच्या अमरावतीला जागाच्या नकाशावर आणण्याचे काम मित्रा टेक्सटाईल पार्कमुळे होणार आहे. अमरावतीला टेक्सटाईल पार्क द्या, अशी आम्ही त्यांना विनंती केली होती. पंतप्रधानांनी देशात सात टेक्सटाईल पार्क दिले, त्यातला एक आपल्या अमरावतीत दिला. या एका पार्कमुळे तीन लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे कापसापासून कापडापर्यंत आणि कापडापासून फॅशनपर्यंत सर्व प्रकारचे इंटिग्रेशन हे तिथे होणार आहे.
विदर्भातील पांढऱ्या सोन्याला खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस येणार आहे. या टेक्सटाईल पार्कमध्ये दहा हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. एक लाखापेक्षा जास्त रोजगार निर्मीतीची शक्यता आहे. गेल्या दहा वर्षात पंतप्रधानांनी भूमिपूजन केलेल्या अनेक प्रकल्पांचे त्यांच्याच हस्ते लोकार्पणही झाले आहे.
देशात कमी कालावधीत पायाभूत सुविंधांचा विकास करण्याचा विक्रम पंतप्रधान महोदयांनी केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक उद्योग महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातला कुशल रोजगारक्षम विकसित भारत घडवण्याच्या कार्यात महायुतीचे सरकार आणि राज्यातील जनता आपले योगदान देईल असा विश्वास व्यक्त करतो.
हेही वाचा:
राज्यातील तिसरी आघाडी कुणावर “प्रहार” करणार ?
निकी तांबोळी स्टाइल ‘बाईssss…’ म्हणत सुषमा अंधारेंचा भाजपावर निशाणा
महायुती आणि मविआला टक्कर देण्यासाठी महाराष्ट्रात तिसरी आघाडी तयार