Google देणार मोठा धक्का! बंद करणार लाखो Gmail अकाउंट

आजमितीस कॉम्प्यूटर आणि लॅपटॉप वापरणारे 99 टक्के लोक गुगल जीमेल(Gmail) आयडीचा वापर करतात. गुगल वेळोवेळी जीमेलसाठी नवीन नियम आणि अटी लागू करत असतो. अशातच गुगलने आता मोठा निर्णय घेतला आहे. कंपनी लाखो जीमेल अकाउंट्स बंद करणार आहे. जर तुम्हीही जीमेल अकाउंट वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. गुगलने हा निर्णय का घेतला, यामागे काय कारण आहे याची माहिती घेऊ या..

तसं पाहिलं तर काही युजर्स एकापेक्षा जास्त जीमेल(Gmail) अकाउंट वापरत असतात. पण यातील बहुतांश अकाउंटचा वापरच होत नाही. म्हणून गुगलने अशाच निष्क्रिय खात्यांना कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. युजर्सने अकाउंट अॅक्टिव्ह ठेवावे यासाठी कंपनीकडून संबंधित युजरला नोटिफिकेशन पाठवले जातात. परंतु, तरीही वापरात नसणाऱ्या जीमेल खात्यांची संख्या वाढत चालली आहे. याचा अर्थ असा की हे खाते आता अॅक्टिव्ह राहिलेले नाही. जर तुमच्याकडेही असे अकाउंट असेल तर आता हे अकाउंट गुगल लवकरच बंद करू शकते.

गुगलने आपल्या सर्व्हरमधील स्पेस वाचविण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. ज्या लोकांनी जीमेल किंवा गुगल ड्राइव्ह सेवांचा वापर केला परंतु बऱ्याच काळापासून त्यांचे अकाउंट अॅक्टिव्ह नसेल तर अशा खात्यांना बंद केले जाऊ शकते. इनअॅक्टिव्ह पॉलिसीनुसार याचे अधिकार गुगलकडे आहेत.

तु्म्ही तुमचे जीमेल अकाउंट डिअॅक्टिव्ह होण्यापासून वाचवू इच्छित असाल तर सर्वात आधी त्या अकाउंटमध्ये लॉग इन करा. तुम्ही या खात्यातून एखादा ईमेल पाठवा किंवा इनबॉक्समध्ये आलेले मेल वाचा. यासोबतच गुगल फोटो अकाउंटमध्ये साइन इन करून फोटो शेअर केले तर तुमचे अकाउंट बंद होणार नाही. किंवा जीमेलवर लॉगइन करुन युट्यूबवर एखादा व्हिडिओ प्ले करू शकता. या व्यतिरिक्त गुगल ड्राइव्हचा वापर करूनही तुम्ही तुमचे जीमेल अकाउंट अॅक्टिव्ह ठेऊ शकता.

हेही वाचा:

शेतकऱ्यांना मिळणार 4194 कोटींचे अनुदान

‘या’ प्रसिद्ध गायिकेनं घेतला अखेरचा श्वास, मृत्यूचं कारण ऐकून म्युझिक इंडस्ट्री हादरली!

उपोषणाचा चौथा दिवस, आधाराशिवाय चालणं मुश्कील, मनोज जरांगेंची प्रकृती खालावली