प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी सध्या तिची प्रेग्नेंसी(pregnant) एन्जॉय करत आहे. लग्नाच्या दीड वर्षानंतर देवोलिना आई होणार आहे. सध्या ती तिचा प्रेग्नेंसी टाईम एन्जॉय करत आहे. अलिकडेच ती तिचा बेस्ट फ्रेंड विशाल सिंहच्या बर्थडे पार्टीमध्ये दिसली होती. विशालच्या वाढदिवसाच्या पार्टीत देवोलीनाने पती शेहनवाज शेखसोबत हजेरी लावली होती. या पार्टीत तिच्या मित्रमंडळींसोबत खूप मजा-मस्ती करताना दिसली. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
देवोलिना भट्टाचार्जी देवोलिना भट्टाचार्जी लवकरच आई होणार आहे. देवोलीनी आणि तिचा शेहनवाज शेखसोबत त्याच्या पहिल्या बाळाच्या आगमनाची वाट पाहत आहेत. देवोलीनाने 15 ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. तिने इंस्टाग्राम पोस्टद्वारे तिच्या प्रेग्नेंसीची माहिती दिली होती. याआधी तिने तिची प्रेग्नन्सी गुपित ठेवली होती, पण तिच्या चाहत्यांनी तिच्या फोटोवरूनच याचा अंदाज लावला होता. अभिनेत्री सध्या प्रेग्नेंसी एन्जॉय करत असताना तिला नेटकऱ्यांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे.
प्रेग्नेंसीमध्ये(pregnant) पार्टी करणाऱ्या देवोलिनावर चाहते भडकले आहेत. विशाल बर्थडे पार्टीतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात देवोलीना एका हातात ड्रिंक घेऊन नाचताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये बेबी बंप अन् हातात ग्लास स्पष्टपणे दिसत असून तिच्या चाहत्यांना तिने बेबी बंपसह डान्स करणं अजिबात आवडलेलं नाही.
आता देवोलीनाच्या या व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका यूजरने लिहिलं आहे की, पहिल्या प्रेग्नेंसीमध्ये अशा उड्या मारणं अजिबात योग्य नाही. दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलंय की, हेच संस्कार आहेत. बेबी बंप घेऊन अशा पद्धतीने नाचणं योग्य नसल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. आणखी एका यूजरने कमेंट करताना लिहिलंय की, “स्वतःची नाही तर किमान तुमच्या पोटात वाढणाऱ्या बाळाची तरी काळजी घ्या.”
हेही वाचा:
शेतकऱ्यांना मिळणार 4194 कोटींचे अनुदान
Google देणार मोठा धक्का! बंद करणार लाखो Gmail अकाउंट
आज संकष्टी चतुर्थीला बाप्पा ‘या’ राशींवर राहणार प्रसन्न!