विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट बंद; सरकारच्या निर्णयाची होतीये सर्वत्र चर्चा

राँची : परीक्षेमध्ये(exams) गैरप्रकार करण्याचे प्रमाण वाढले आहे. काही विद्यार्थी आपली हुशारी परीक्षेपेक्षा जास्त गैरप्रकार करण्यामध्ये दाखवत आहेत. यासाठी झारखंड सरकारने हटका निर्णय घेतला आहे. झारखंडमध्ये सामान्य पदवी स्तरावरील एकत्रित स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी झारखंड राज्य सरकारने शनिवार आणि रविवारी हे दोन दिवस इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला.

झारखंड सरकारकडून परीक्षेमधील गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा(exams) कालावधीमधील तब्बल पाच तास इंटरनेट सेवांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हेमंत सोरण सरकारने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की इंटरनेट सेवा दोन दिवस सकाळी 8 ते दुपारी 1.30 पर्यंत बंद राहतील. परीक्षेतील फसवणूक रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

परीक्षेच्या तयारीबाबत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे या चर्चेमध्ये ठरवण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांबाबत कोणताही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे झारखंडच्या मुख्यमंत्री स्पष्टपणे सांगितले आहे.

याबाबत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोशल मीडियावर देखील याबाबत माहिती दिली आहे. ट्वीट करत त्यांनी लिहिले आहे की, नुकतेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगातर्फे उद्यापासून घेण्यात येणाऱ्या संयुक्त पदवी स्तर परीक्षेच्या तयारीबाबत माहिती घेतली आणि आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या. कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. सर्व उमेदवारांना माझ्या हार्दिक शुभेच्छा, असे हेमंत सोरेन यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे.

झारखंडच्या गृह विभागाने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की 21-22 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 1.30 पर्यंत, फिक्स्ड टेलिफोन लाईनवर आधारित व्हॉईस कॉल आणि ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी सुरू राहू शकते. हा आदेश भारतीय दंड संहिता 2023 च्या कारवाईचे उल्लंघन आहे. कलम 223 आणि भारतीय टेलिग्राफ कायदा 1885 च्या तरतुदींनुसार कारवाई केली जाईल.

काही उपद्रवी विद्यार्थी परीक्षेदरम्यान मेसेजिंग किंवा चॅटद्वारे इतर उमेदवारांना पेपर्स पुरवले जातात. हे रोखण्यासाठी झारखंड राज्य सरकारचे इंटरनेट सेवांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्यत: पेपरफुटीशी संबंधित लोक परीक्षेपूर्वी व्हॉट्सॲप किंवा इतर मेसेजिंग ॲपद्वारे पेपर फोडण्याचा करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा:

खंडपीठ मागणीसाठी पुन्हा एकदा एल्गार ‌!

आज संकष्टी चतुर्थीला बाप्पा ‘या’ राशींवर राहणार प्रसन्न!

बेबी बंप अन् हातात ग्लास, प्रेग्नेंसीमध्ये पार्टी करणाऱ्या अभिनेत्रीवर भडकले नेटकरी