विधानसभेचे बिगुल लवकरच वाजणार! निवडणूक आयोगाचा तीन दिवसीय महाराष्ट्र दौरा

मुंबई : लोकसभा निवडणूकीनंतरच राज्यामध्ये विधानसभा(Assembly) निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार असून त्यासाठी पक्ष तयारीला लागले आहेत. महायुतीसह महाविकास आघाडी देखील जोरदार तयारी करत आहे.

लोकसभा निवडणूकीच्या निकालावरुन महायुतीने विधानसभेसाठी(Assembly) जोरात तयारी सुरु केली आहे. पक्षांच्या नेत्यांचे आणि इच्छुकांचे दौरे, सभा आणि बैठका देखील वाढल्या आहेत. दोन्ही युतीमधील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आली असून परिवर्तन महाशक्ती ही तिसरी आघाडी तयार झाली आहे. यामध्ये आता निवडणूक आयोगाने देखील तयारीला सुरुवात केली आहे. निवडणूक आयोग महाराष्ट्राच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आले आहे.

निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणूकीची घोषणा केली आहे. त्यावेळी महाराष्ट्राच्या निवडणूका जाहीर होतील अशा अपेक्षा होत्या. हरियाणा व महाराष्ट्राच्या निवडणूकीच्या मागील 15 वर्षांपासून एकत्रित होत होत्या. आता मात्र राज्यातील निवडणूकांना उशीरा झाल्याची टीका विरोध केली.

मात्र आता निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीच्या पूर्वतयारीला सुरुवात केली आहे. यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्येक जिल्ह्याचा अहवाल मागवला होता. त्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्रात तीन दिवसीय दौऱ्यावर येणार आहेत.

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक 26 सप्टेंबरला राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. 26 ते 28 सप्टेंबर निवडणूक आयोगाचा हा दौरा असणार आहे. यावेळी राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी आणि उपलब्धी याबाबत आढावा घेतला जाणार आहे. त्याचबरोबर प्रमुख राजकीय पक्ष आणि अधिकाऱ्यांसोबत देखील पथकांच्या बैठकी होणार आहे. यावेळी आयोगाकडून निवडणूकीच्या दृष्टीने सूचना, निर्देश आणि आदेश दिले जाणार आहेत. राज्याच्या निवडणूकीसाठी हा आयोगाचा दौरा महत्त्वपूर्ण असणर आहे.

निवडणूक आयोगाच्या या दौऱ्याअंती 28 सप्टेंबर रोजी निवडणूक आयोग अधिकारी पत्रकार परिषद घेणार आहे. यावेळी अधिकारी काय बोलणार याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. 28 तारखेलाच निवडणूक आयोग निवडणूकीची तारीख आणि संपूर्ण कार्यक्रम जाहीर करणार का याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी तयारीचा जोर वाढवला असून जागावाटपाची बोलणी देखील अंतिम टप्प्यामध्ये आणली आहे.

हेही वाचा:

ई-श्रम कार्डची ताकद वाढवणार, मिळणार 10 पट अधिक फायदे, सरकारनं घेतला मोठा निर्णय

आत्महत्येचा विचार करणारा इथला शेतकरी खूष कसा ?

‘नवरात्रीत संघर्ष व्हावा अशी माझी..’, राज ठाकरेंनी दिला इशारा