‘शाहिद कपूरशिवाय मी…’; 17 वर्षांनी करिनाने ब्रेकअपबद्दल केला मोठा खुलासा

बॉलिवूडमध्ये(bollywood) एकेकाळी ज्या कपलची प्रचंड चर्चा झाली, ते कपल म्हणजे शाहिद कपूर आणि करिना कपूर खान. त्या कपलनं चाहत्यांना धक्का देत वेगळं व्हायचा निर्णय घेतला, त्यांच्या ब्रेकअपचं कारण अद्यापही त्यांनी सांगितलं नाही. पण आता दोघेही आपापल्या आयुष्यात खूप पुढे निघून गेले आहेत.

17 वर्षांपूर्वी या दोघांचा ‘जब वी मेट’ हा चित्रपट(bollywood) प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. इतकंच नव्हे तर आता 17 वर्षांनंतरही या चित्रपटाची प्रेक्षकांमधील क्रेझ कायम आहे. यामध्ये शाहिदने आदित्यची आणि करीनाने गीतची भूमिका साकारली होती.

या ऑनस्क्रीन जोडीचे आजही लोक फॅन्स आहेत. मात्र याच चित्रपटाच्या शुटींगनंतर दोघेही वेगळे झाले. मात्र त्यांनी वेगळं होण्याचं निर्णय का घेतला याचं कारण कोणालाच माहिती नाही. अशात ब्रेकअपनंतर 17 वर्षांनी शाहिद कपूरविषयी करीना व्यक्त झाली आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करीना ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच शाहिदविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. शाहिद कपूरशिवाय गीतची भूमिका इतकी गाजू शकली नसली, असं तिने म्हटलंय.

गीतची भूमिका आदित्यपेक्षा प्रचंड विरोधातली होती. मी याठिकाणी शाहिदचे नक्कीच आभार मानू इच्छिते. कारण त्याने या चित्रपटात अप्रतिम काम केलंय. आम्हा दोघांची ऊर्जा त्या भूमिकांसाठी पूरक ठरली. त्याच्याशिवाय हा चित्रपट पूर्ण होऊच शकला नसता, असं ती पुढे म्हणाली.

‘जब वी मेट’ हा चित्रपट ऑक्टोबर 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने 50.9 कोटी रुपयांची कमाई केली होती. हिंदीत यश मिळाल्यानंतर या चित्रपटाचं तमिळ आणि तेलुगूमध्येही डबिंग करण्यात आलं होतं.

हेही वाचा:

शेतकऱ्यांसाठी अजित पवारांची मोठी घोषणा, भरसभेत दिलं आश्वासन

कोयता नाचवत १० घरांच्या काचा फोडल्या, तोडफोडीचा थरार CCTVत कैद

आंघोळ करणाऱ्या महिलांचे ‘तो’ बनवायचा व्हिडिओ; कोट्यवधींची जमवली प्रॉपर्टी अन्…