महाराष्ट्रात दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत(political news) फूट पडली. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. प्रत्येकी दोन-दोन पक्ष निर्माण झाले. त्यानंतर निवडणूक आयोगाने आव महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गटाला पक्ष म्हणून मान्यता दिली आहे आणि पक्षाचे चिन्ह देखील दिले. यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले आहे. ठाकरे गटाने आणि एकनाथ शिंदे आणि शरद पवार गटाने अजित पवार गटाविरुद्ध कोर्टात धाव घेतली आहे. आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
येत्या मंगळवारी(ता.२४) सुप्रीम कोर्टात शिवसेना(political news) आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी होणार आहे. हे प्रकरण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे आहे. लवकरच सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे निवृत्त होणार आहेत. त्याआधी या प्रकरणाचा निकाल ते देणार का? याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. तर सुनावणी होत असल्याने आमदारांच्या मनातील धाकधूक वाढली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांचे अपात्रता प्रकरण सुप्रीम कोर्टात सुरू आहे. त्या प्रकरणावर येत्या मंगळवारी सुनावणी होणार आहे. मंगळवारी या प्रकरणाचा क्रमांक खूप दूर असल्याने त्या दिवशी सुनावणी होणार की, नवीन तारीख मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सारखया तारखा पडत होत्या. याआधी १८ सप्टेंबर ही तारीख देण्यात आली होती. त्यानंतर २२ ऑक्टोबर ही तारीख देण्यात आली होती.
मात्र सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड ८ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. तसेच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्याआधीच सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आमदार अपात्रता प्रकरणावर ऐतिहासिक निकाल देणार का? याकडे देशाचे लक्ष लागले आहे. चंद्रचूड यांच्यात काळामध्ये अनेक ऐतिहासिक निकाल आले आहेत.
मात्र आमदार अपात्रता प्रकरण हे अत्यंत गुंतागुंतीचे असल्याने यावर काय निकाल येणार हे पाहावे लागणार आहे. राज्यातील सत्ता संघर्षाप्रमाणेच, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या चिन्ह आणि पक्ष या प्रकरणावरील सुनावणी देखील प्रलंबित आहे. वारंवार सुनावणी लांबणीवर पडत असल्याने विरोधकांकडून यावर टीका देखील करण्यात येत आहे.
हेही वाचा:
शेतकऱ्यांसाठी अजित पवारांची मोठी घोषणा, भरसभेत दिलं आश्वासन
कोयता नाचवत १० घरांच्या काचा फोडल्या, तोडफोडीचा थरार CCTVत कैद
‘शाहिद कपूरशिवाय मी…’; 17 वर्षांनी करिनाने ब्रेकअपबद्दल केला मोठा खुलासा