पुणे: एका ई-कॉमर्स कंपनीचा डिलिव्हरी (Delivery)बॉय पार्सल घेऊन पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 52 वस्तूंची ऑर्डर असतानाही ग्राहकांना केवळ 10 वस्तूंचेच वितरण करण्यात आले. उर्वरित वस्तूंसह डिलिव्हरी बॉय अचानक गायब झाला, ज्यामुळे ग्राहक आणि कंपनी या दोघांनाही मोठा धक्का बसला आहे.
प्राप्त माहितीनुसार, संबंधित डिलिव्हरी बॉयने पुणे शहरात विविध ग्राहकांच्या ऑर्डर घेऊन जाताना या वस्तूंचा अपहार केला. ग्राहकांनी वस्तू न मिळाल्याबद्दल तक्रारी केल्यानंतर कंपनीने तपास सुरू केला आणि या प्रकाराचा पर्दाफाश झाला.
कंपनीने याबाबत तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत. अशा प्रकारच्या घटना ऑनलाइन खरेदीवर विश्वास ठेवणाऱ्या ग्राहकांना हादरवणाऱ्या ठरत आहेत.
हेही वाचा:
सासरच्या छळामुळे महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; पती, सासूसह चौघांवर गुन्हा दाखल
रीलसाठी तरूणांनी वृद्ध व्यक्तीला दिला त्रास; व्हिडिओ पाहून लोकांचा राग अनावर
करमाळ्यात कुकडीच्या पाण्यावरुन राजकारण तापले ; मित्रपक्षातच जुंपली