रक्तातील घाण कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी सकाळी उपाशी पोटी करा ‘या’ पाण्याचे सेवन

धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकदा महिला आणि पुरुषांना आरोग्याकडे (health)लक्ष द्याला वेळ भेटत नाही. सतत काम करत राहणे, बाहेरील तेलकट आणि तिखट पदार्थांचे सेवन करणे, चुकीच्या सवयी फॉलो करणे, अमली पदार्थांचे सेवन करणे इत्यादी अनेक गोष्टींमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. चुकीच्या सवयींमुळे शरीरात हळूहळू कोलेस्ट्रॉलची वाढ होऊ लागते.

शरीरात(health) खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर रक्तवाहिन्यांसंबंधित समस्या उद्भवतात. त्यामुळे योग्य तो आहार घेऊन आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. शरीरात घाण कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर हृदयविकार होण्याची शक्यता असते. शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेले घाण कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी कोणत्या पदार्थाचे पाणी प्यावे, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. घरगुती उपाय केल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

आल्याचे पाणी अनेक आजारांवर औषधी आहे. आल्याचे पाणी बनवण्यासाठी सर्वप्रथम टोपात 1 ग्लास पाणी घेऊन ते गरम करण्यासाठी ठेवा. पण गरम झाल्यानंतर त्यात साल काढून बारीक चेचून घेतलेले आलं टाका. आल्याच्या पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घ्या. आल्याचे पाणी गाळून झाल्यानंतर तुम्ही त्यात मध किंवा तयार केलेले पाणी नुसतेच पिऊ शकता.

शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर एक ग्लास पाणी गरम करायला ठेवून त्यात बारीक चेचून घेतलेले आलं, लिंबू आणि लसूण टाकून पाणी व्यवस्थित उकळवून घ्या. टोपात पाणी अर्धे झाल्यानंतर गॅस बंद करून घ्या. हे पाणी तुम्ही पिऊ शकता. आल्याच्या पाण्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच आल्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म आढळून येतात. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होऊन नसांना आलेली सूज कमी होते. आल्याचे पाणी तुम्ही वजन कमी करण्यासाठी सुद्धा पिऊ शकता.

आल्याच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पोटातील विषारी पदार्थ बाहेर पडून जातात. शरीराची पचनक्रिया बिघडल्यानंतर शरीरामध्ये अतिरिक्त चरबी वाढण्यास मदत होते. रक्तवाहिन्यांमधील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित आल्याच्या चहाचे किंवा पाण्याचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

हेही वाचा:

खाऊचे आमिष दाखवून 5 वर्षीय मुलावर अनैसर्गिक कृत्य

भाजप आमदाराचा शिंदे गटाच्या आमदारावर गंभीर आरोप

भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस हेमंत वरुटे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा