सांगलीत भर पावसात पुल ओलांडणारा तरुण गेला वाहून

सांगली जिल्ह्यात उत्तरा नक्षत्राच्या पावसाने(rain) जोरदार हजेरी लावली असून, तासगाव-खानापूर तालुक्यांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे छाटणी झालेल्या द्राक्ष पिकांसह काढणीला आलेल्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे रब्बी हंगामातील पेरण्या लांबणीवर गेल्या आहेत.

अग्रणी नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे(rain) नदी वाहती झाली असून, कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगाव येथील पुलावरून जाण्याचा प्रयत्न करणारा एक तरुण वाहत्या पाण्यात वाहून गेला. ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागल्याने अनेक गावखेड्यातील रस्ते आणि पाणंद पाण्याखाली गेले आहेत.

द्राक्ष बागांमध्ये पाणी साचल्याने फळछाटण्या झालेल्या बागांवर पावसाचा फटका बसला आहे. तसंच काढणीस आलेल्या उडीद, मूग, भुईमूग या खरीप पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. मात्र, रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा:

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार? अजित पवार महायुतीतून पडणार बाहेर?

रक्तातील घाण कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी सकाळी उपाशी पोटी करा ‘या’ पाण्याचे सेवन

प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत सेटवर मोठी दुर्घटना, चेहरा भाजला Video Viral