सतर्क! आज ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता

या आठवड्यात महाराष्ट्रात जोरदार पावसाचा(rain) अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज 23 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे. पुढील काही दिवस विदर्भ, मराठवाडा, कोकण व मध्य माहाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली असून त्याची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने सुरू आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पाऊस(rain) पुन्हा एकदा हजेरी लावणार आहे. आजपासून पुढील तीन दिवस राज्यात बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आज मुंबईत वादळी वाऱ्याचा पाऊस होणार, असा अंदाज आहे. गेल्या काही दिवसापासून मुंबईकर उकाड्यामुळे त्रस्त झाले आहेत. अशात मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. मुंबईत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे तापमानात काही अंशी घसरण होण्याची तसेच उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

आज मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, तसेच विजांच्या कडकडाटासह ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याचीही शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची देखील शक्यता आहे. मुंबईसह राज्यातील इतर ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे.

आज 23 सप्टेंबर रोजी रायगड, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, चंद्रपूर, गडचिरोली येथे मेघ गर्जना, विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. एकंदरीत मुंबई-पुणेसह मराठवाडा, कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुणे व परिसरात आज आणि उद्या आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी व संध्याकाळी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 24 ते 26 सप्टेंबर दरम्यान आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

भाजप आमदाराला काँग्रेस-शरद पवार गटाचा जाहीर पाठिंबा, मिरज पॅटर्न पुन्हा चर्चेत

कोल्हापूरच्या राजकारणातली मेहुण्या/ पाहुण्याची गोष्ट….!

नणंद-भावजय एकत्र बाहेर पडल्या, पण भावजय घरी परतलीच नाही; नंतर झुडपात…