नवऱ्याचा लटकलेला मृतदेह, पत्नीची खाली हळदी-कुंकवाने पूजाअर्चा; इथं घडली धक्कादायक घटना

गेल्या आठ दिवसांपूर्वी नाशिकमध्ये कौटुंबिक वादातून पतीने आत्महत्या(suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत पतीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. मात्र सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही घटना घडल्यानंतर पती गळफास घेतलेल्या म्हणजेच लटकलेल्या अवस्थेत असताना त्याच्या मृतदेहाच्या शेजारीच त्याची पत्नी पूजा करत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे नाशिक शहरात खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, 11 सप्टेंबर 2024 ला जेलरोड भागात रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास नवनाथ भगवंत घायवट यांनी स्वयंपाक घरात गळफास(suicide) घेतला होता. त्यावेळी या घटनेची नोंद नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली होती. मात्र आता या घटनेच्या आठ दिवसांनी पतीने गळफास घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावेळी पतीचा मृतदेह छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकत असताना शेजारीच पत्नी पूजा विधी करत असल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, गळफास घेतलेल्या अवस्थेतील पतीच्या लटकत्या मृतदेहासमोर मांडलेल्या पूजा साहित्याजवळ पत्नी दिसत आहे. तसेच मृतदेहाच्या अंगावर देखील ठिकठिकाणी हळद आणि कुंकवासारखे पूजेचे साहित्य लावलेले दिसत आहे. त्यावेळी हा सर्व प्रकार जादूटोणा असल्याचं बोललं जात होत. याशिवाय हा संपूर्ण प्रकार जादूटोणा किंवा अंधश्रद्धेतून घडल्याची चर्चा सर्वत्र पसरली होती.

या संपूर्ण प्रकरणामध्ये आता या घटनेमध्ये पुन्हा एक ट्विस्ट आला आहे. नाशिक रोड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत या घटने संदर्भात पुन्हा तपास केला आहे. त्यावेळी त्यांनी हा संपूर्ण प्रकार अंधश्रद्धेतून झाला नसल्याचं म्हटलं आहे. तसेच मानसिक आणि कौटुंबिक वादातून पतीने आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

मात्र संबंधित पत्नी ही मनोरुग्ण असल्याचा दावा नातेवाईक आणि पोलिसांनी केला आहे.याशिवाय तिच्यावर वैद्यकीय उपचारसुद्धा सुरू आहेत. तसेच मिळलेल्या माहितीनुसार घायवट यांचं किराणा मालाचं दुकान असून त्यांची मुलं शिकण्यासाठी पुण्याला असतात. मात्र पत्नी सतत घर सोडून जायची. ती वेडसर असल्याने नेहमी वाद होत असल्याने नवनाथ घायवाट यांनी आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा:

राज ठाकरे CM एकनाथ शिंदेविरुद्ध उमेदवार देणार? ‘हा’ चेहरा चर्चेत

रोहित शर्माची भर मैदानात जादू?, बेल्स फिरवल्या मग मंत्रही फुंकला; पाहा Video

सरकारचा मोठा निर्णय, विधानसभेपूर्वी सरपंच, उपसरपंचांच्या मानधनात होणार वाढ