मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस(Politics) पक्ष फुटीनंतर आता पक्षातील बडे नेते मोठी वक्तव्ये करत असल्याचं चित्र दिसून येत आहे. काही दिवसांपुर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी आपली चूक झाल्याचं कबूल करत मोठं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना पक्षफुटीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
राष्ट्रवादी अजित पवार यांची असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी मागितलं असतं तर पक्षाने त्यांना हवं ते दिलं असतं. पक्ष तोडण्याची काय गरज होती? पण त्यांनी आमचं जीवन अस्ताव्यस्त करून ठेवलं आणि ते निघून गेले असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2024 मध्ये त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी(Politics) काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीने पक्षाचे 2 गट निर्माण झाले. त्यानंतर खरी राष्ट्रवादी कोणाची असा प्रश्न निर्माण झाला. यासंबधी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, जर मागितलं असतं तर सर्व दिलं असतं, पक्ष हिसकावण्याची गरज नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजित पवार यांना पक्षात ठेवायचं होतं, परंतु त्यांनीच आमचं आयुष्य अस्त व्यक्त करत सोडून जाण्याचा निर्णय घेतला असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, मी कधीही पक्षात नेतृत्वाची मागणी केलेली नाही. अजित हे मिळवण्यासाठी सर्व प्रयत्न काही करत होते. जर त्यांनी मागितलं असतं तर सर्व दिलं असतं. पक्ष हिसकावण्याची गरज नव्हती.
अजित पवारांनी वेगळी भूमिका घेत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांच्या या निर्णयामागे अनेक शक्यता व्यक्त केल्या जात होत्या. त्यात सुप्रिया सुळेंना पक्षाचं नेतृत्व हवं होते असं देखील म्हटलं गेलं, अजित पवारांना त्यांच्या मनासारखं पद दिलं गेलं नसल्याचंही अनेकांनी म्हटलं. त्या चर्चांचं सुप्रिया सुळेंनी खंडन केलं. मला पक्षाचं नेतृत्व अजित पवारांना देऊन आनंद झाला होता, असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, राष्ट्रवादीला अजित पवारांना कायम पक्षात ठेवायचे होते, पण अजित पवारांनी आमचं जीवन अस्ताव्यस्त केलं. त्याचबरोबर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आपण कधीही राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची मागणी केली नव्हती. ते मिळवण्यासाठी ते अजित पवार सर्व काही करत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात (Politics)पक्षपाती वृत्तीचा आरोप फेटाळून लावला आहे. अजित पवार किंवा त्यांच्या पक्षातील कोणाशीही या विषयावर खुल्या चर्चेला मी तयार आहे, असे त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
पक्षात वारसाहक्कावरून वाद नाही, पण अजित पवार यांनी ज्या पद्धतीने वागले ते चुकीचे आहे. त्यांनी आमचे जीवन अस्तव्यस्त केले आणि निघून जाणे पसंत केले. त्यांच्याकडे एक पर्याय होता; हे सर्व त्यांनी स्वत:कडेच ठेवायला हवे होते.” पुढे त्या म्हणाल्या, “पक्षात वारसाहक्कावरून लढत नव्हती तर एनडीए आघाडीत सामील होण्यावरून (भाजप-शिवसेना यांच्या युतीत सामील होणे) हा वाद होता.”
हेही वाचा:
मॅच दरम्यान कानपुर स्टेडियमवर होऊ शकतो अपघात, BCCI चं टेन्शन वाढलं
हसन मुश्रीफांच्या XXXखोर वक्तव्यावर समरजितसिंह घाटगेंचा नाव न घेता हल्लाबोल
‘येक नंबर’ चित्रपटात दिसणार राज ठाकरे? चित्रपटाचा ट्रेलर पाहिला का?