सर्वात मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील पुन्हा शरद पवार गटात जाणार?

ऐन विधानसभा निवडणुकीच्या(political news today) तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. तर, महायुतीला म्हणावी तशी छाप सोडता आली नाही. लोकसभेतील विजयामुळे मविआ नेत्यांचा विश्वास वाढला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षात नेत्यांची इनकमिंग सुरू असल्याचं चित्र आहे. भाजप आणि अजित पवार गटातील अनेक नेत्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय.

अजित पवारांच्या(political news today) राष्ट्रवादीची देखील हीच स्थिती असल्याचं दिसून येतंय. अशात अजित पवार यांना सर्वांत मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीला दांडी मारली आहे. इतकंच नाही तर, ते पुण्यात शरद पवार यांची भेट घेणार असल्याची देखील चर्चा आहे.

वळसे पाटील हे मंत्रीमंडळ बैठकीला दांडी मारून शरद पवारांची भेट घेणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिलीप वळसे पाटील हे हाती तुतारी घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जाऊ शकतो.

दुसरीकडे अजित पवार गटातील आणखी काही नेते देखील शरद पवारांच्या संपर्कात आहेत. अजित पवार समर्थक असलेले माढा विधानसभेचे आमदार बबनदादा शिंदे हे आज शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. बबनदादा शिंदे आणि विलास लांडे हे दोन्ही नेते अजित पवार यांच्या गटात आहेत. मात्र, दोघेही शरद पवारांच्या भेटीसाठी गेल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत.कालच राजन पाटील यांनीदेखील शरद पवार यांची भेट घेतली होती.

विलास लांडे यांनी मागे भोसरी विधानसभेची निवडणूक लढवली होती. आता विलास लांडे आणि बबनदादा शिंदे दोघेही शरद पवारांच्या भेटीसाठी गेल्याने याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. भाजपमध्ये देखील अनेक नेते हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.

कोल्हापूरमधील भाजप नेते शिवाजीराव पाटील भाजपला धक्का देत शरद पवार गटात जाणार, अशा आता चर्चा होऊ लागल्या आहेत. शरद पवार यांच्या पक्षाकडून पाटील यांच्याशी संपर्क झाल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी कागलमधील समरजीत घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय. आता चंदगडमधून शिवाजीराव पाटील देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

हेही वाचा:

नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

खतरों के खिलाडीच्या विजेत्याला ट्रॉफीसह मिळालं बरचं काही? 

टीम इंडियात पडली फूट? हार्दिक आणि शमीच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे चाहते टेन्शनमध्ये