मुंबई : राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीला निवडणूक होण्याची शक्यता आहे(candidate). तसेच येत्या काही दिवसांत निवडणूक आयोग आचारसंहितेची घोषणा करण्याची शक्यता आहे. दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीची तयारी सुरू आहे.
दरम्यान केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य असलेले अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. महायुतीच्या नेत्यांसोबत अमित शहांची एक बैठक पार पडली. विधानसभा निवडणुकीबाबत ही बैठक पार पडली. दरम्यान या बैठकीत जागावाटपाबद्दल चर्चा झाल्याचे समजते आहे. अशातच आता अजित पवार यांनी साताऱ्यामधील फलटण विधानसभा मतदार संघातील उमदेवार(candidate) जाहीर केला आहे.
फलटण विधानसभा मतदारसंघातील उत्तर कोरेगाव तालुक्यातील सोळशी ग्रामपंचायतीच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार होते. परंतु त्यांना या कार्यक्रमास उपस्थित राहता आले नाही. मात्र त्यांनी सभेत फोनवरुन नागरिकांसोबत संवाद साधला. त्यावेळी आगामी फलटण विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा केली. अजित पवार यांनी विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली.
अजित पवार फोनवरुन बोलताना म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तुमचे गाव फलटण विधानसभा मतदारसंघात आहे. या मतदार संघात आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. विधानसभा निवडणुकीत दीपक चव्हाण हे उमेदवार आहेत. तुम्ही त्यांना आशीर्वाद द्यावेत आणि सहकार्य करावे. त्यांना संधी दिल्यानंतर तुमच्या मतदार संघ अन् जिल्ह्यासाठी लागणारा करोडो रुपयांचा निधी देईन. माझ्यावर विश्वास ठेवावा. मायमाऊलींना भाऊबीजेची ओवाळणी दिल्याशिवाय तुमचा भाऊ गप्प बसणार नाही.
हेही वाचा:
सर्वात मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील पुन्हा शरद पवार गटात जाणार?
टीम इंडियात पडली फूट? हार्दिक आणि शमीच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे चाहते टेन्शनमध्ये
खतरों के खिलाडीच्या विजेत्याला ट्रॉफीसह मिळालं बरचं काही?