५०० च्या नोटेवर गांधींजींचा नाही तर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा फोटो

सध्या AI चा वापर सर्वाधिक वाढला आहे. हा AI चा वापर अगदी पंतप्रधानांपासून कोणत्याही सेलिब्रिटीचा डिपफेक व्हिडिओ सध्या व्हायरल झाल्या होत्या. या व्हिडिओ व्हायरल होत असतानाच सेलिब्रिटींचा फोट वापरून खोट्या नोटा बनवल्याचे उघडकीस आले आहे. नोटांवर(money) आपण कायमच महात्मा गांधी यांचे फोटो पाहतो. पण आता अशातच सध्या सोशल मीडियावर अभिनेता अनुपम खेर यांचा फोटो असलेल्या नोटा व्हायरल होत आहे.

अनुपम खेर यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर खोट्या नोटांचा(money) व्हिडिओ शेअर केलेला आहे. व्हिडिओ शेअर करत त्यांनी खोट्या नोटांचं आश्चर्य व्यक्त केलं आहे. व्हिडिओमध्ये ५०० रुपयांची नोट पाहायला मिळत आहे. त्या नोटेवर गांधींच्या फोटोच्या ऐवजी अभिनेते अनुपम खेर यांचा फोटो वापरण्यात आला आहे. सध्या त्यांचा फोटो असलेल्या ५०० च्या नोटेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. त्यांनी व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन दिले की, ” आता काय बोलायचं… पाचशेच्या नोटेवर गांधीजींच्या फोटो ऐवजी माझा फोटो ? काहीही होऊ शकतं…”

अनुपम खेर यांनी शेअर केलेला व्हिडिओ TV9 गुजराती चॅनलवरील असल्याचे दिसत आहे. ह्या बनावट खोट्या नोटा अहमदाबादमध्ये सापडल्याचे कळत आहे. अनुपम यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, ५०० च्या नोटांप्रमाणेच त्याही नोटांचा रंग आणि डिझाईन अगदी सेम टू सेम होता. फक्त फरक इतकाच की, महात्मा गांधी यांच्या फोटोच्या ऐवजी, अनुपम खेर यांच्या फोटोचा वापर करण्यात आला आहे.

कोणत्याही नोटेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं लिहिण्यात येतं, पण त्या नोटेवर रिझोल बँक ऑफ इंडिया असं लिहिण्यात आलं आहे. या बनवाट नोटांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अभिनेत्याने चाहत्यांना अशा बनावट नोटांपासून सावधगिरी बाळगायला सांगितली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराफा व्यापारी मेहुल ठक्करकडून खोट्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. व्यापाराने दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने त्यांना १ कोटी ६० लाख रुपये रोख रक्कमेच्या स्वरूपात दिलेली आहे. ही रक्कम त्याने व्यापाराला एका बॅगेतून दिली.

बॅग उघडून पाहिली असता नोटांवर गांधीजींच्या फोटोंच्या ऐवजी अनुराग यांचा फोटोंचा वापर केला होता. व्यापाराने अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या नोटा कोणी बनवल्या ? या नोटांचा मुख्य सुत्रधार कोण ? यांसह अनेक प्रश्नांचे उत्तर पोलिस सध्या शोधत असून पोलिसांसोबतच अभिनेते अनुपम खेर यांनीही नागरिकांना या खोट्या नोटांपासून सांभाळून राहण्यास सांगितले आहे.

हेही वाचा:

सर्वात मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील पुन्हा शरद पवार गटात जाणार?

टीम इंडियात पडली फूट? हार्दिक आणि शमीच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे चाहते टेन्शनमध्ये

मोठी बातमी! महायुतीचा पहिला उमदेवार ठरला; अजित पवारांनी केली घोषणा