अभिनेता गोविंदाला लागली स्वतःच्याच रिव्हॉल्वरमधून सुटलेली गोळी

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते(Actor) गोविंदा यांच्याकडून चुकून बंदुकीची गोळी झाडली गेल्याची माहिती समोर आली आहे. स्वत:च्या बंदुकीतून गोळी सुटल्यामुळे गोविंदा जखमी झाला आहे. ही गोळी गोविंदाच्या पायात शिरली. त्यामुळे आता गोविंदा यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बॉलिवूड अभिनेता(Actor) गोविंदा यांच्याकडून मिसफायर झाल्याची माहिती मिळत आहे. स्वतःच्याच बंदुकीतून सुटलेली गोळी गोविंदाला लागली, त्यामुळे गोविंदाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घटनेत गोविंदा यांच्या पायाला गोळी लागल्याची माहिती मिळत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सकाळी काही कामानिमित्त घराबाहेर पडताना चुकून गोविंदा यांच्याकडून मिसफायर झाली आहे. सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. गोविंदा यांच्याकडे परवानाधारक पिस्तुल आहे. ते सकाळी बाहेर जाण्यासाठी आपल्या गाडीने निघाले होते.

त्यावेळी गाडीत बसताना गोविंदा यांच्याकडील पिस्तुलमधून चुकून गोळी सुटली आणि ती थेट पायात शिरली. गोविंदा यांच्यावर सध्या क्रिटी केअर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, हा प्रकार नेमका कसा घडला, याबाबत नेमकी माहिती समोर आलेली नाही. पोलीस सध्या याप्रकरणाचा तपास करत आहेत.

हेही वाचा:

विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा ऐतिहासिक ‘महाविक्रम’!

शरद पवार हे तर राज्यातील मिनी…: आमदार पडळकरांची पवारांवर तीव्र टीका

उद्धव ठाकरेंना आमदार होण्यासाठी निवडणूक लढवण्याचे आव्हान: एकनाथ बावनकुळे