जिल्ह्यात रात्रीचे फिरतात संशयित ड्रोन? नागरिकांमध्ये पसरली दहशद

पुण्यातील मुळशी भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मध्यरात्रीच्या सुमारास आकाशात मोठ्या संख्येने ड्रोन(drone) फिरत असल्याने पुणेकर भयभीत झाले आहेत. एकाच वेळी आकाशात तीन ते चार ड्रोन घिरट्या घालत आहेत. तसेच त्या ड्रोनला लाल व हिरव्या रंगाच्या लाईट्स लागत असल्याने मुळशी मधील नागरिकांची झोप उडाली आहे. अशातच आता हे ड्रोन नेमके कुणाचे आहेत व ते ड्रोन आकाशात कशासाठी घिरट्या घालतात? असे प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झाले आहेत.

पुण्याच्या मुळशी तालुक्यात रात्रीच्या सुमारास आकाशात उडणाऱ्या ड्रोनमुळे(drone) प्रचंड दहशत पसरली आहे. अगदी पुण्याजवळील हिंजवडी आयटी पार्कपासून भूगाव, पौड पर्यंत अशा संपूर्ण मुळशी तालुक्यात या ड्रोनने खळबळ उडवली आहे. तसेच अगदी काही दिवसांपूर्वी अशाप्रकारचे ड्रोन या परिसरात फिरत होते. यामधील एक दोन ड्रोन एका घरावर देखील कोसळले होते. मात्र त्याचे गूढ अद्यापही उलगडलेलं नाही.

मात्र काही दिवसांपासून या भागात ड्रोन दिसणं बंद झालं होतं. मात्र आता पुन्हा आकाशात मोठ्या प्रमाणात हे ड्रोन घिरट्या घालत आहेत. मुळशी परिसरात दररोज किमान दहा ते बारा ड्रोन फिरत आहेत. मात्र या ड्रोनला रोखण्यासाठी दोन विरोधी यंत्रणा खरेदी करणार असल्याचे पुणे ग्रामीण पोलिस यांनी यापूर्वीच म्हणले होते. मात्र आता त्याचं काय झालं हे देखील अद्याप कळू शकलेलं नाहीये.

याशिवाय या ड्रोनद्वारे घरांवर दरोडा टाकण्याचा काही उद्देश आहे का? तसेच ड्रोनद्वारे रेकी केली जात आहे का? अशा एक ना अनेक शंका गावातील नागरिकांनी उपस्थित केल्या आहेत. याशिवाय संरक्षणासाठी नागरिक रात्रभर गावात पहारा देत आहेत. मात्र कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका असं आवाहन आता पुणे ग्रामीण पोलिसांनी केलं आहे.

तसेच आता गावागावात ड्रोन उडणारे व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत. गेल्या काही महिन्यापूर्वी सातारा, बीड, अहमदनगर, जालना अशा अनेक ठिकाणी ड्रोन फिरत होते. मात्र या घटनेमुळे लोकांची झोप उडवली आहे.

हेही वाचा:

विधानसभेच्या तोंडावर ‘स्वराज्या’ची नांदी; छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आनंदवार्ता…!

दिवाळीपूर्वीच महागाईचा भडका! गॅस सिलिंडर महागले

अभिनेता गोविंदाला लागली स्वतःच्याच रिव्हॉल्वरमधून सुटलेली गोळी