लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये शिंदे(latest political news) गटाला चांगलं यश मिळालं. शिंदे गटाने बऱ्याच जागांवर विजय मिळविला. तर, अजित पवार गटाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. लोकसभेनंतर राज्यात आता लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहे. यासाठी सर्वच पक्ष रणनीती आखत आहेत.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये(latest political news) विविध कारणांमुळे धुसफूस सुरू असल्याचं दिसून येतंय. काही ठिकाणी उमेदवारीवरुन नेत्यांमध्ये नाराजी दिसून येतेय तर कुठे एका पक्षाला झुकतं माप दिल्याने नेते मंडळीमध्ये नाराजीनाट्य असल्याचं बोललं जातंय.
या 5 ऑक्टोबररोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार आहेत. मोदी मुंबई मेट्रोच्या तिसऱ्या लाईनचे उद्घाटन करणार आहेत. मुंबई ऐवजी ठाण्यात म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गडात हा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये नाराजीनाट्य सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
इतकंच नाही तर, भाजप पक्षश्रेष्ठींकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना झुकते माप दिले जात असल्याचे देखील म्हटले जात आहे. मेट्रो तीनच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुंबईत करण्याऐवजी ठाण्यात केले जाणार आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांना शक्तिप्रदर्शन करण्याची चांगली संधी असणार आहे.
त्यातच राज्यातील विविध मंडळांवर शिंदे गटाच्या नेत्यांची वर्णी लागली आहे. एसटी महामंडाळाचे अध्यक्षपद भरत गोगावले यांना मिळालं आहे. तर, सिडको महामंडळाचे अध्यक्षपद हे संजय शिरसाट यांना मिळाले आहे. यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना संधी दिली गेली नाही. सत्तेतील लाभ व महत्वाची पदे शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाला मिळत असल्याचे दिसून येत आहे.
यामुळे भाजपमधील पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत ठाणे मतदारसंघाचा तिढा वाढला होता. भाजप कार्यकर्ते ठाणे मतदार संघ शिवसेनेसाठी सोडण्यास तयार नव्हते. मात्र, भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी दबाव आणून ही जागा शिंदे गटाला सोडण्यास भाग पाडले. आता विधानसभा निवडणुकीतही भाजपच्या काही जागांवर शिंदे गटाने दावा केला आहे. यामुळे भाजपमध्ये नाराजी वाढत चालल्याचं बोललं जातंय.
हेही वाचा:
राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, भाजपचा ‘हा’ मोठा नेता ‘तुतारी’ हाती घेणार?
सोशल मीडियावर उपदेशाचे डोस देणाऱ्या चैतन्य महाराजांना बेड्या
Google कडून मोठी घोषणा, आता Google Pay वर मिळणार गोल्ड लोनची सुविधा !