धक्कादायक ! पत्नीसोबत झाला वाद; संतापलेल्या पतीने फावड्याने हल्ला करून केली हत्या

गोंदिया : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यात आता पत्नीसह शेतात गेलेल्या पतीने शेतात पत्नीशी भांडण करून तिच्या डोक्यावर लोखंडी फावड्याने मारून(attacked) तिची हत्या केली. ही घटना सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी येथे मंगळवारी (दि. 1) दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली.

साधना भीमराव सोनटक्के (वय 55) असे यामध्ये हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी येथील भीमराव सोनटक्के हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तो तिला एकटी कुठेही जाऊ देत नव्हता. मंगळवारी तो पत्नी साधनासह शेतात गेला होता. दरम्यान, शेतात त्या दोघांमध्ये भांडण झाले. रागाच्या भरात भीमरावने हातातील फावडे साधनाच्या डोक्यावर मारले(attacked). यात तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर तो पसार झाला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच डुग्गीपार पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. राजकुमार भीमराव सोनटक्के (वय 33) याच्या तक्रारीवरून पोलिसांनी भीमरावविरोधात गुन्हा दाखल केला असून, तपास पोलिस निरीक्षक काळे करत आहे.

काही दिवसांपूर्वीच सोलापूर जिल्ह्यातील हुन्नूर येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरुन तसेच खर्चासाठी पैसे का देत नाही? या कारणावरुन भावा-भावांमध्ये वाद झाला. यामध्ये भावानेच भाऊ नवनाथ पुजारी याचा झोपलेल्या ठिकाणी डोक्यात दगड घालून खून केला. हा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.30) उघडकीस आला.

हेही वाचा:

सावरकर कुणाला कळले तर कुणास ना कळाले…!

गुगलचे भारतासाठी मोठे पाऊल! भारतात स्वच्छ ऊर्जा क्षमता वाढविण्यासाठी क्लीनमॅक्सबरोबर केली भागीदारी

सणासुदीत कमाईची मोठी संधी! देशातील सर्वात मोठा IPO दिवाळीपूर्वी येणार