अभिजात भाषा ठरली आमुची मराठी जिंकली!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र शासनाच्या दिल्ली दरबारी प्रलंबित असलेली मागणी अखेर मान्य झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी त्याबद्दलची घोषणा केली आणि मराठी भाषेला(sign language) अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी सह पाली, प्राकृत, आसामी, आणि बंगाली या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्याचा निर्णय झाला.

माझा मराठीचे बोलू कौतुके, अमृतातेही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन असे संत ज्ञानेश्वरांनी म्हटले होते. मराठी भाषेचे श्रीमंती अनेक संतांनी बोलून दाखवली आहे, लिहून ठेवली आहे. मराठी भाषा प्राचीन आहे. तिला किमान अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे. तितके जुने साहित्य निर्माण झाले आहे. असे अनेक पुरावे देऊन महाराष्ट्राने केंद्राकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी केली होती. अनेक वर्षांची ही जुनी मागणी अखेर या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्य केली तितकेच म्हणे तर मराठी भाषा ही देशाचा स्वाभिमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अभिजात भाषेचा(sign language) दर्जा मिळाल्यानंतर महाराष्ट्रात सर्व थरातून त्याचे स्वागत केले जाते, केंद्र शासनाचे कौतुक केले जाते आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ख्यातनाम साहित्यिक आणि कवी वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांनी सुमारे 30 वर्षांपूर्वी माझी मराठी भाषा किती हिनदीन झाली आहे याचे वर्णन करणारी एक कविता लिहिली होती. मराठी भाषेची प्रतीकात्मक मूर्ती आणि त्याच्याखाली तिची किती दयनीय अवस्था झाली आहे याबद्दलची कविता कोरण्यात आली आहे. शासकीय मराठी भाषा, बोलीभाषा, तिचे होणारे विडंबन, भ्रष्ट शब्द संस्कृती याबद्दल कुसुमाग्रजांनी अगदी पोटतिडकीने लिहिले होते. केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल, ते हयात असते तर त्यांनी पंतप्रधानांना कडकडून मिठी मारून आभार मानले असते.

देशात एकूण 22 अधिकृत भाषा आहेत. त्यापैकी मराठी एक आहे. मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे तर नजीकच्या गोवा राज्याची ती सह अधिकृत भाषा आहे. कुसुमाग्रज यांचा जन्मदिन म्हणून दरवर्षी दिनांक 27 फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. युनेस्को या जागतिक संस्थेने दिनांक 21 फेब्रुवारी हा जागतिक मातृभाषा दिन म्हणून जाहीर केला आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी, तिची उपक्रमशीलता वाढावी यासाठी प्रयत्न आता केले पाहिजेत अशा प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या साहित्य प्रांतातून व्यक्त होताना दिसतात. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने विशेष प्रयत्न केले होते. पंतप्रधानांच्या कार्यालयास सुमारे पाच लाख पोस्ट कार्ड पाठवली गेली होती. साहित्य संमेलनाच्या अथक प्रयत्नामुळेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असल्याचे साहित्यिकांच्याकडून म्हटले जाते.

मराठी भाषा(sign language) श्रीमंत आहे, समृद्ध आहे. ती देशातील एक प्रमुख भाषा ठरली आहे. एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने मागणी केली जात होती तेव्हा मराठी भाषेवर अतिक्रमणे होतं होती. पण ती अपरिहार्य आहेत असे समजून तिच्याकडे दुर्लक्ष केले गेले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी मराठी भाषेतील काही शब्दांना पर्यायी शब्द उपलब्ध करून दिले. उदाहरण द्यायचे झाल्यास चित्रपट या शब्दाला बोलपट, तसेच दिग्दर्शक वगैरे सुमारे पाचशे शब्द त्यांनी मराठी भाषेला दिले आहेत. सावरकर यांनी जेवढे मराठी भाषेवर संस्कार केले तेवढे अन्य कुणी केले असतील असे वाटत नाही.

दर 50 मैलांवर बोली भाषा बदलत असते, तिचा उच्चार बदलत असतो, तिचा लहेजा बदलत असतो. त्यामुळेच मराठी भाषेला एक वेगळे सौंदर्य, सौष्ठव प्राप्त झाले आहे. मराठी भाषेवरून, ती बोलण्यावरून संबंधित व्यक्ती कोणत्या प्रदेशाची आहे, कोणत्या भागाची आहे हे समजते. कवी कुसुमाग्रज यांनी म्हटले आहे की “भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचा दिवा विझे”

हेही वाचा:

सुख-समृद्धीने जीवन फुलेल, देवी चंद्रघंटा आज ‘या’ राशींना देणार आशीर्वाद!

‘कोहलीने टीममध्ये आग लावली’, विराट विषयी असं का म्हणाला हरभजन सिंह?

माझ्या कुटुंबाचं नाव घेतलंच कसं? अभिनेत्याचा मंत्र्याविरुद्ध 100 कोटींचा खटला