कोल्हापुरात श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. कोल्हापूरचे(kolhapur)अंबाबाईचे मंदिर हे पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक आणि महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे.
शारदीय नवरात्रोत्सवाच्या शेवटी विजयादशमी येते. महिषासुराचा वध झाल्यानंतर जो विजयोत्सव झाला, त्याचे यथोचित पूजारुपाने प्रतिकात्मक दर्शन घडविण्यासाठी आजची (kolhapur)श्री महालक्ष्मी अंबाबाईची रथारूढ पूजा आहे. दुष्ट आणि असुरी शक्तींचा विनाश करून विजयोत्सव साजरा करण्याची प्रेरणा विजयादशमीपासून मिळते. रथ हा एक प्राचीन वाहनप्रकार आहे. रथाचा प्रचार आणि महत्त्व ऋग्वेद काळापासून आढळते.
नमो रथेभ्यः स्थपतिभ्यश्च वो नमः’ अशी रथप्रशस्ती यजुर्वेदात दिसून येते. कोनार्कच्या प्राचीन सूर्यमंदिराच्या शिल्पातही रथाचे महत्त्व प्रतिबिंबित झालेले दिसते. प्रामुख्याने वेगासाठी घोडे रथाचे वाहक म्हणून वापरले जात असत आणि सारथी त्यांच्यावर नियंत्रण ठेवत असे. प्रतिवर्षी विजयादशमीला अशी पारंपारिक पूजा बांधली जाते.
हेही वाचा:
सुख-समृद्धीने जीवन फुलेल, देवी चंद्रघंटा आज ‘या’ राशींना देणार आशीर्वाद!
‘कोहलीने टीममध्ये आग लावली’, विराट विषयी असं का म्हणाला हरभजन सिंह?
माझ्या कुटुंबाचं नाव घेतलंच कसं? अभिनेत्याचा मंत्र्याविरुद्ध 100 कोटींचा खटला