राज्यात विधानसभा निवडणूक लवकरच लागू होणार आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकार अनेक घोषणा करत आहे. मात्र अशातच आता राज्यातील शेतकऱ्यांना आणि महिलांना वेगवेगळ्या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ सरकारकडून दिला जात आहे. त्यामुळे राज्यातील भाग्यवंत कुंटुंबाना(families) दिवाळीपूर्वी योजनांचे एकूण मिळून 7000 रुपये मिळणार आहेत.
राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात एकूण 3000 रुपये राज्य सरकारकडून पाठवले जात आहेत. राज्य सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे येत्या 10 ऑक्टोबर देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पात्र महिलांना या योजनेचे 3000 रुपये लवकरच मिळणार आहेत.
याशिवाय केंद्र सरकारच्या पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 18 हप्त्याच्या वितरणास देखील सुरुवात झाली आहे. 18 च्या हप्त्याचे पैसे वितरण करण्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज वाशिमच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी एका कार्यक्रमात मोदींनी पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या वितरणाचा शुभारंभ केला आहे. त्यामुळे आता या योजनेअंतर्गत 18 व्या हप्त्याचे 2000 रुपये पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
राज्यातील शेतकऱ्यांचं हिट लक्षात घेता पीएम शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजनेला देखील सुरुवात केलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला तब्बल 6000 रुपये दिले जात आहेत. मात्र ही रक्कम तीन टप्प्यांत विचारात केली जाते. अशातच आता या योजनेच्या पाचव्या हत्याचे वितरण करण्यास देखील सुरुवात झाली आहे. या पाचव्या हप्त्यात लाभार्थी शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार आहेत.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी राबवलेल्या विविध योजनेचे पैसे येण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे या महिन्यात भाग्यवंत कुटुंबाच्या(families) खात्यावर तब्बल 7000 रुपये जमा होणार आहेत. म्हणजेच आता राज्यातील लाभार्थी नागरिकांची दिवाळी देखील गोड होणार आहे.
हेही वाचा:
आरक्षणाबाबत राहुल गांधींचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “कॉँग्रेस 50 टक्के..”
कोल्हापुरात राहुल गांधींना दाखवले काळे झेंडे; भाजपा कार्यकर्ते अन् पोलिसांमध्ये जोरदार झटापट
उद्धव ठाकरेंना धक्का; शिवसेना गटाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांचा शिंदे गटात प्रवेश