सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज(Video) व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ अपल्याला थक्क करतात तर काही व्हिडिओ पाहून आपला राग अनावर होतो. अनेकदा यात काही धक्कादायक घटनांचे व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात, ज्यांना पाहून आपला त्याच्यावर विश्वासच बसत नाही. सध्या असाच एक धक्कादायक आणि घृणास्पद व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही रागाचा पारा वर जाईल.
आज समाज इतका दूषित झाला आहे की प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक वेळी महिलांना असुरक्षित वाटू लागते. त्या कधी कोणत्या भक्षकाचे शिकार होतील याची शाश्वती नसते. लांडग्यांचे डोळे प्रत्येक कोपऱ्यावर असतात. सध्या अशाच दोन क्रूरांचा व्हिडिओ(Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्याने महिलेवर जबरदस्तीने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने वेळीच काही लोक तेथे आले आणि त्यांनी महिलेची त्या क्रूरांपासून सुटका केली. या घटनेचा व्हिडिओ जवळील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे आणि याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
व्हिडिओमध्ये एक तरुण महिलेचा छळ करत असल्याचे दिसत आहे. तरुणाची सुटका करून घेण्यासाठी ती महिला त्याच्यापासून दूर जाते. तेवढ्यात दुसरा तरुणही त्या महिलेजवळ येतो आणि तो तिच्या जवळ जातो. यानंतर तो महिलेला जबरदस्तीने पकडतो आणि तिच्यावर जबरदस्ती करत असताना तो तिचे चुंबन घेतो. त्यानंतर तरुणाने महिलेला जमिनीवर फेकले आणि तिच्या अंगावर चढून तिच्यासोबत दुष्कृत्य करण्याचा प्रयत्न सुरू केला. दरम्यान, योग्य वेळी तिथे आणखी दोन तरुण येतात आणि त्या क्रूरांना महिलेपासून दूर ढकलतात. यानंतर घटनास्थळी जमाव जमला आणि त्या तरुणांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
हा व्हायरल व्हिडिओ @NoCapFights नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, इस्तंबूलमध्ये दोन पुरुषांनी एका तरुण मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत 2 करोडोंहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मतदेखील मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “बहिष्कार ही एकमेव शिक्षा आहे…” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “नशीब, ती माणसे महिलेच्या बचावासाठी आली”
हेही वाचा:
शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार, ठाकरेंकडे इनकमिंग सुरु
मोठी बातमी! युवकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये, काय आहे योजना?
सांगली : मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत