जयसिंगपूर : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत शिरोळ तालुक्यातील 1290 कुटुंबांना(families) घरकुल मंजूर झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक घरे ही शिरोळ तालुक्यात मंजूर करण्यात आली आहेत. या योजनेंतर्गत टप्पा एकमधील लाभार्थ्यांना गृहप्रवेशाची किल्ली तर टप्पा दोनमधील लाभार्थ्यांना मंजुरी पत्र माजी मंत्री आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
संपूर्ण हा कार्यक्रम जयसिंगपूर येथील स्व. शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहात पार पडला. या कार्यक्रमाला तहसीलदार अनिलकुमार हेळकर, गटविकास अधिकारी नारायण घोलप, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडूरंग खटावकर, विस्तार अधिकारी कदम, घरकुल योजना अधिकारी एम. डी. संपकाळ आणि शिरोळ तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामीण विकास अधिकारी आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, कार्यक्रमाच्या समारोपात लाभार्थ्यांना गृहप्रवेशासाठी किल्ल्या आणि मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी लाभार्थीच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसून येत होता.
शिरोळ तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेतून मंजूर झालेली घरे जिल्ह्यात सर्वाधिक असून, हे तालुका घरकुल योजनेंतर्गत राज्यात आघाडीवर आहे. या योजनेमुळे शिरोळ तालुक्यातील अनेक कुटुंबांना आपले हक्काचे घर मिळाले आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होणार आहे.
शिरोळ तालुक्यातील कुटुंबांना(families) निवारा देण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहे. या घरकुल योजनेंतर्गत घरकुल बांधकामास सरकारकडून आवश्यक निधी पुरविला जात आहे. ज्यामुळे तालुक्यातील अनेक कुटुंबांची घराचे स्वप्न पूर्ण होत आहे.
हेही वाचा:
मोदींचं मंदिर बांधणाऱ्या नेत्याचा भाजपला रामराम
हत्तीला काठी मारणं पडलं भारी, १० सेकंदात तोडून टाकली हाडं Video Viral
‘बिग बॉस’चा विजेता सुरज चव्हाणला बक्षीस म्हणून मिळाला 14 लाखांचा चेक अन्ं बरंच काही