महाराष्ट्रातील नागरिकांसाठी Good News; लालपरीच्या ताफ्यात आणखी 2500 गाड्या दाखल होणार

महाराष्ट्रातील एसटी(st) सेवा, जी ग्रामीण भागातील जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते, लवकरच अधिक वेगवान होणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 2500 नव्या डिझेल बस पुढील वर्षात दाखल होणार आहेत. एसटी महामंडळाने पर्यायी माध्यमांतून महसूल मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला असून, या नवीन बस ताफ्यामुळे प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळणार आहे.

महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव कुसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटीच्या(st) ताफ्यात 14,000 बसगाड्या आहेत. यापैकी 5000 गाड्या एलएनजीमध्ये आणि 1000 गाड्या सीएनजीमध्ये रुपांतरित करण्यात येणार आहेत. एसटीला नेहमी फायद्यात ठेवण्यासाठी जुनी येणी वसूल करण्यावर भर दिला जात आहे, आणि या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 200 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.

शिवनेरी सेवा होणार अधिक आकर्षक

पुणे मार्गावरील शिवनेरी बस सेवा आता अधिक आरामदायी होणार आहे. एसटी महामंडळाने हवाई सेवांच्या धर्तीवर प्रवाशांच्या सेवेसाठी “शिवनेरी सुंदरी” ही विशेष परिचारिका नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवेमुळे प्रवाशांना त्यांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता चांगली सेवा मिळणार आहे.

महिला बचत गटांना प्रोत्साहन

एसटी महामंडळाने महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने प्रत्येक बस स्थानकावर 10×10 आकाराचे स्टॉल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्टॉलद्वारे महिला बचत गटांना स्थानिक पदार्थ विक्री करण्याची संधी मिळणार असून, त्यासाठी नाममात्र भाडे आकारले जाणार आहे.

नवीन आगारांची निर्मिती

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल आणि अमरावती जिल्ह्यातील धारणी या आदिवासी भागांमध्ये एसटीचे नवे आगार उभारले जाणार आहेत. या आगारांची निर्मिती झाल्यानंतर एसटी महामंडळाचे एकूण आगारांची संख्या 253 होईल.

एसटी महामंडळाच्या या निर्णयांमुळे प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळेल, तसेच महामंडळाचे आर्थिक आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

हेही वाचा:

अखेर हर्षवर्धन पाटील आज शरद पवार गटात प्रवेश करणार

‘बिग बॉस’चा विजेता सुरज चव्हाणला बक्षीस म्हणून मिळाला 14 लाखांचा चेक अन्ं बरंच काही

कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात 1290 कुटुंबांचा निवाऱ्याचा प्रश्न मिटणार; घरकुल योजना मंजूर