गुड न्यूज! उच्चांकी दरवाढीनंतर सोनं झालं स्वस्त

गेल्या दोन महिन्यापासून मौल्यवान धातू सोनं जोरदार आघाडी घेत आहे. सोन्याची(Gold) आता जवळपास 80 हजारांकडे तर चांदी 1 लाखांकडे वाटचाल करत आहे. जागतिक घडामोडीचा परिणाम हा सर्वच वस्तूवर होत आहे. शेअर बाजारापासून ते सर्वच सेवा, वस्तूंवर त्याचा परिणाम दिसत आहे. अशात ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.

या आठवड्यात बेशकिंमती धातुत चांगलीच घसरण झाली आहे. गेल्या दोन आठवड्यात सोन्यात(Gold) 2300 रूपयांची वाढ झाली. सणासुदीत मौल्यवान धातु आणखी वधारण्याची शक्यता आहे. या आठवड्याच्या सुरूवातीला सोन्यात घसरण आली. सोमवारी, 7 ऑक्टोबर रोजी सोने 220 रुपयांनी उतरले. तर आज सकाळच्या सत्रात सोन्यात 100 रुपयांची घसरण दिसत आहे.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, आता 22 कॅरेट सोने 71,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. पाहायला गेलं तर सोनं अजूनही 75 हजारांच्या पुढेच आहे. दुसरीकडे चांदीत 29 सप्टेंबरपासून कोणताच बदल दिसून आला नाही. मात्र, 5 ऑक्टोबररोजी चांदीत 2 हजारांची वाढ दिसली. तर, आज 8 ऑक्टोबररोजी चांदीत घसरण दिसून आली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 97,000 रुपये आहे.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार 24 कॅरेट सोने 75,933, 23 कॅरेट 75,629, 22 कॅरेट सोने 69,555 रुपयांवर घसरले. तर 18 कॅरेट आता 56,950 रुपये, 14 कॅरेट सोने 44,421 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.

दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते.

हेही वाचा:

तरुणीने प्रियकरासोबत जीवन संपविले; वडिलांनीही आत्महत्या केल्याने गावात शोककळा

बैलाला लाल कपडा दाखवण्याचा नाद तरुणाला पडला महागात; व्हिडिओचा शेवट अंगावर काटा आणणारा

सार्थक शिंदे यांचा ‘गारुड’ 25 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित – नवीन मराठी चित्रपटसृष्टीत एक दमदार प्रयत्न!

पहिली अडीच वर्षे शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास भाजपची तयारी होती