अजित पवारांना धक्का, कट्टर समर्थक लढवणार अपक्ष निवडणूक?

महाराष्ट्रात विधानसभा(politics) निवडणुका लवकरच होणार आहेत. मात्र, अद्याप निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या नाहीत. त्यापूर्वीच राजकीय पक्ष रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. मात्र, निवडणुकीपूर्वीच अजित पवार आणि भाजपला गळती लागल्याचं चित्र दिसून येतंय. गेल्या काही दिवसांत अनेक नेत्यांनी मविआत प्रवेश केलाय. अशात अजित पवार गटाला आणखी एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे.

अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले करमाळ्याचे (politics)आमदार संजय मामा शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. संजयमामा शिंदे हे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी स्वत: याबद्दलची माहिती दिली आहे. त्यामुळे अजित पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

माझं श्रद्धास्थान शरद पवार साहेब आहेत, तर माझे नेते अजित पवार आहेत, असं वक्तव्य संजयमामा शिंदे यांनी केलंय. राजकारणात टिकायचे असेल तर राजकारण हे जातीवर, पुण्याईवर टिकणार नाही. राजकारण टिकण्यासाठी विकासाचा दृष्टीकोन असेल तरच ते लाँगटर्म टिकेल, असंही संजयमामा शिंदे म्हणाले.

मी अपक्ष निवडणूक लढवणार असलो तरीही मी कोणत्या पद्धतीने निवडणूक लढवणार याची त्यांना पूर्ण कल्पना आहे, असं संजय मामा शिंदे यांनी सांगितले आहे. अजित पवार यांनी करमाळयातील लाडक्या बहिणीच्या कार्यक्रमात बोलताना संजयला मत द्या असं म्हटलं होतं, मात्र, यावेळी त्यांनी कोणत्याही चिन्हाचा उल्लेख केला नव्हता. त्यामुळे हे सगळं परवानगी घेऊन केलेलं असून मी करमाळा विधानसभा मतदारसंघातून 100 टक्के अपक्ष निवडणूक लढवणार, अशी घोषणाच संजयमामा शिंदे यांनी केली आहे.

दरम्यान, अजित पवार यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. आमदार बबनदादा शिंदे यांनी स्वत: न लढता मुलगा रणजितसिंह यांना लढवण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी त्यांनी शरद पवारांना गळ घातली असल्याची चर्चा आहे. तर, त्यांचे बंधु करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे हे 2019 मध्ये अपक्ष निवडणूक लढवून जिंकले होते. आता ते अजित पवारांसोबत आहेत. मात्र, संजयमामा शिंदे यांनी थेट अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केलीये.

हेही वाचा:

रोहित शर्मा ‘या’ स्पर्धेनंतर कसोटीतून निवृत्ती जाहीर करणार? 

दिवसाढवळ्या हत्येचा थरार; दिरानेच केली दोन्ही वहिनींची हत्या

खिलाडी कुमारचा ‘सरफिरा’ सिनेमा या दिवशी OTT वर होतोय रिलीज!

गुड न्यूज! उच्चांकी दरवाढीनंतर सोनं झालं स्वस्त